पाकिस्तानसोबतची परराष्ट्र मंत्री स्तरावरील चर्चा भारताकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 06:17 PM2018-09-21T18:17:41+5:302018-09-21T18:17:56+5:30

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेदरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये नियोजित चर्चा भारताकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चेला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे.

Foreign Minister-level talks with Pakistan canceled | पाकिस्तानसोबतची परराष्ट्र मंत्री स्तरावरील चर्चा भारताकडून रद्द

पाकिस्तानसोबतची परराष्ट्र मंत्री स्तरावरील चर्चा भारताकडून रद्द

 नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेदरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये नियोजित चर्चा भारताकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चेला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे.  काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलातील जवानांची करण्यात आलेली हत्या आणि दहशतवाद्यांची छायाचित्रे पोष्टाच्या तिकीटावर छापण्याच्या पाकिस्तानने केलेल्या आगावूपणामुळे संतप्त होऊन भारताने पाकिस्तानसोबतची चर्चा रद्द केली आहे. 




 काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्करानं कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांना शहीद ठरवून, बुरहान वानी आणि त्यांच्या साथीदारांच्या नावे टपाल तिकिटं काढून त्यांनी आपल्या 'नापाक' वृत्तीचे दर्शन घडवले होते. 





परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले की, " पाकिस्तानचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रांचा विचार करून आम्ही द्विपक्षीय चर्चेचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानी पंतप्रधानांनी दहशतवादावरही चर्चेची तयारी दर्शवली होती. मात्र चर्चेमागचा त्यांचा नापाक हेतू आता समोर आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा खरा चेहरा त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच समोर आला आहे. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानमधील कोणत्याही प्रकारची चर्चा निरर्थक आहे."  



 

Web Title: Foreign Minister-level talks with Pakistan canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.