परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवली, आयबीच्या अलर्टनंतर गृहमंत्रालयाकडून झेड सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 18:32 IST2023-10-12T18:06:02+5:302023-10-12T18:32:00+5:30
झेड कॅटगरीमध्ये ४ ते ६ एनसीजी कमांडो, सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांचा समावेश आहे.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवली, आयबीच्या अलर्टनंतर गृहमंत्रालयाकडून झेड सुरक्षा
नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या रिपोर्टनुसार एस जयशंकर यांची सुरक्षा वाय वरून झेड कॅटगरीची करण्यात आली आहे. याचबरोबर, अमित जोगी यांची सुरक्षा मंत्रालयाने झेड कॅटगरीत वाढवली आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, आयबीने जारी केलेल्या धमकीच्या रिपोर्टनंतर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाय वरून झेड करण्यात आली आहे. आयबीच्या रिपोर्टनंतर गृह मंत्रालयाने हे मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता एस जयशंकर यांच्या सुरक्षेसाठी पूर्वीपेक्षा जास्त जवान तैनात केले जाणार आहेत. एस जयशंकर यांच्या सुरक्षेसाठी आता ३६ सीआरपीएफ कमांडो तैनात करण्यात येणार आहेत.
झेड कॅटगरीची सुरक्षा म्हणजे काय?
केंद्र सरकारने सुरक्षेसाठी एकूण ५ कॅटगरी तयार केल्या आहेत. यामध्ये एक्स, वाय, वाय प्लस, झेड आणि झेड प्लस कॅटगरी आहेत. व्यक्तीचे महत्त्व आणि धोका लक्षात घेऊन ही सुरक्षा दिली जाते. याशिवाय, पंतप्रधानांसाठी एसपीजी सुरक्षेचीही तरतूद आहे. झेड कॅटगरीमध्ये ४ ते ६ एनसीजी कमांडो, सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांचा समावेश आहे.