परदेशवारीची ‘पोस्ट’ प्राप्तिकराच्या रडारवर

By admin | Published: May 23, 2016 05:12 AM2016-05-23T05:12:51+5:302016-05-23T05:12:51+5:30

सध्या सोशल मीडियाचा वापर खूपच वाढला असून, कोणत्याही सेलीब्रेशनची छायाचित्रे लगेचच सोशल मीडियावर टाकण्याची अनेकांना घाई झालेली असते.

Foreign Posts 'post' on receiver's radar | परदेशवारीची ‘पोस्ट’ प्राप्तिकराच्या रडारवर

परदेशवारीची ‘पोस्ट’ प्राप्तिकराच्या रडारवर

Next

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियाचा वापर खूपच वाढला असून, कोणत्याही सेलीब्रेशनची छायाचित्रे लगेचच सोशल मीडियावर टाकण्याची अनेकांना घाई झालेली असते. अनेक जण पर्यटनस्थळी किंवा पिकनिकला गेल्यानंतर तिथले फोटो फेसबुकवर पोस्ट करतात. मात्र असे फोटो पोस्ट कराल, तर यापुढे कदाचित अडचणीत याल; कारण तुमच्या फेसबुक अकाउंटवर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांची नजर असू शकेल. विशेषत: तुम्ही फॉरेन टूरची छायाचित्रे पोस्ट केलीत, तर तुम्हाला हा पैसा आला कोठून, अशी नोटीस प्राप्तिकर विभागाकडून येण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत मुंबई, दिल्ली, चेन्नई अशा महानगरांतील वा मोठ्या शहरांतील करदात्यांना असा अनुभव आलेला नाही. पण निमशहरी, ग्रामीण भागातील करदात्यांच्या फेसबुक पोस्टवर लक्ष ठेवले जात आहे. पश्चिम बंगालच्या आसनोलमध्ये राहणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंटला त्याच्या परदेशवारीच्या छायाचित्रांमुळे हा अनुभव आला. त्याने फॉरेन टूरची फेसबुकवर पोस्ट केलेली छायाचित्रे पाहून त्याच्याकडे विचारणा झाली. अर्थात फेसबुक पोस्टवर अशा ऐशआरामाची छायाचित्रे दिसल्याने त्यावरून कोणताही निष्कर्ष काढणे वा त्याआधारे करदात्यांना त्रास देणे हा प्राप्तिकर विभागाचा हेतू नव्हता. मात्र, यावरून खरे उत्पन्न जाणून घेण्याचा विचार आहे. अनेक करदाते प्रत्यक्षात आपले उत्पन्न कमी दाखवून, करही कमीच भरतात. त्यासाठी व्यवसायातील मंदी किंवा अन्य कारणे दिली जातात. पण हीच मंडळी सहकुटुंब परदेशी सहलीला जातात, तिथे मोठ्या हॉटेलांमध्ये उतरतात, मोठ्या वस्तू खरेदी करतात आणि या साऱ्याची छायाचित्रे नातेवाईक व मित्रांना पाहायला मिळावीत, यासाठी फेसबुकवर पोस्ट करतात. कमी उत्पन्नाचे कारण दाखवून करचुकवेगिरी केल्याची शंका प्राप्तिकर विभागाला यामुळे येत आहे. त्यासाठीच फेसबुकवर नजर ठेवण्याचे त्यांनी ठरवले असल्याचे कळते.

Web Title: Foreign Posts 'post' on receiver's radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.