परराष्ट्र सचिव विजय गोखलेंसमोर अनेक आव्हाने, मुत्सद्दीपणाचा लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 02:10 AM2018-01-30T02:10:14+5:302018-01-30T02:10:32+5:30

डोकलामच्यावरून चीनशी सुरू असलेला ७३ दिवसांचा वाद सोडविण्यात महत्वाची भूमिका पार पाडणारे मुत्सद्दी आणि अनुभवी परराष्ट्रविषयक तज्ज्ञ विजय गोखले यांनी सोमवारी परराष्ट्र सचिवपदाचा पदभार स्वीकारला. चीनसह शेजारी देशांशी संबंध सुधारण्याचे मोठे आव्हान विजय गोखले यांच्यापुढे आहे.

 Foreign Secretary Vijay Gokhale will face many challenges, diplomacy | परराष्ट्र सचिव विजय गोखलेंसमोर अनेक आव्हाने, मुत्सद्दीपणाचा लागणार कस

परराष्ट्र सचिव विजय गोखलेंसमोर अनेक आव्हाने, मुत्सद्दीपणाचा लागणार कस

Next

नवी दिल्ली : डोकलामच्यावरून चीनशी सुरू असलेला ७३ दिवसांचा वाद सोडविण्यात महत्वाची भूमिका पार पाडणारे मुत्सद्दी आणि अनुभवी परराष्ट्रविषयक तज्ज्ञ विजय गोखले यांनी सोमवारी परराष्ट्र सचिवपदाचा पदभार स्वीकारला. चीनसह शेजारी देशांशी संबंध सुधारण्याचे मोठे आव्हान विजय गोखले यांच्यापुढे आहे.
शेजारी देशांशी संबंध सुधारण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. भारत आणि पाकिस्तानात तणाव कायम आहे. दक्षिण आशियातील मालदीव हा असा एकमेव देश आहे जिथे अद्याप मोदी यांनी दौरा केलेला नाही. चीनशी संबंध हळूहळू सुधारत आहेत. नेपाळशी संबंधही फारसे अनुकूल नाहीत किंवा ते चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत.
भूतानमध्ये पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. बांंग्लादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यासोबतचे संबंध कायम राहिले तरी, भारत - पाकिस्तानमधील संबंधातील गुंतागुंत कायम राहू शकते. त्यामुळे परराष्ट्र धोरणाकडे मोदी यांनी विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते. मात्र, त्यांची व्यक्तिगत शैली जोखीम असलेली आहे. राष्ट्रीय सुरक्षा, गुंतवणूक, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, कौशल्य विकास हे सरकारचे निवडणुकीचे मुद्दे असतील.

आखती देशांशी चांगले संबंध

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पॅरिस करारातून घेतलेली माघार असो की, जेरुसेलमला इस्रायलची राजधानी जाहीर केल्याचे प्रकरण असो, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अशा अनेक घडामोडी घडत असताना त्याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटत आहेत. मोदी सरकारने आखाती देशांशी संबंधातही चांगली सुधारणा केली आहे.

या भागात ७ लाख भारतीय राहतात. संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांच्याशीही संबंधात सुधारणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र धोरण आगामी काळात
कोणते वळण घेते ते भविष्यात स्पष्ट होणार आहे. त्यासाठी विजय गोखले यांच्या मुत्सद्दीपणाचा मात्र कस लागणार आहे.

Web Title:  Foreign Secretary Vijay Gokhale will face many challenges, diplomacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.