विदेशी पर्यटकांच्या तक्रारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 03:47 AM2017-11-10T03:47:56+5:302017-11-10T03:48:03+5:30
विदेशी पर्यटकांबाबत गुन्हेगारी घटना वाढत आहेत. यांतील बहुतांश घटनांत आरोपी वाचतात. कारण, या प्रकरणांची सुनावणी होते, तेव्हा पर्यटक मायदेशी गेलेले असतात.
संतोष ठाकूर
नवी दिल्ली : विदेशी पर्यटकांबाबत गुन्हेगारी घटना वाढत आहेत. यांतील बहुतांश घटनांत आरोपी वाचतात. कारण, या प्रकरणांची सुनावणी होते, तेव्हा पर्यटक मायदेशी गेलेले असतात. त्यामुळे विदेशी पर्यटकांना तक्रार देण्यासाठी व सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.
केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी ‘लोकमत’ला आम्ही केंद्रीय गृह मंत्रालयाशी याबाबत चर्चा केली आहे. विदेशी पर्यटकांना तक्रार दाखल करण्यासाठी आणि नंतर सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा द्यावी आणि त्यास कायदेशीर मान्यता द्यावी, अशी मागणी आम्ही केली आहे.
त्यासाठी प्रसंगी कायद्यात बदल करावा, कारण हा देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. अलीकडेच आग्रा व पाटण्यात विदेशी जोडप्याला झालेल्या मारहाणीबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले की, यासाठी आपणास विदेशातील दूतावास व उच्चायुक्त कार्यालयांची घेता येईल. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर तक्रार दिली जात असताना आपला प्रतिनिधीही तेथे असेल.