परदेशी विद्यापीठांमुळे देशात शिक्षण परवडेनासे होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 06:35 AM2020-08-03T06:35:31+5:302020-08-03T06:36:07+5:30

प्रा. भूषण पटवर्धन यांचे मत उच्चशिक्षणातील बदल स्वागतार्ह; धोरणकर्त्यांना दिला सावधगिरीचा इशारा

Foreign universities will make education in the country unaffordable! | परदेशी विद्यापीठांमुळे देशात शिक्षण परवडेनासे होईल!

परदेशी विद्यापीठांमुळे देशात शिक्षण परवडेनासे होईल!

Next

टेकचंद सोनवणे।

नवी दिल्ली: परदेशी विद्यापीठांना भारतात आणण्याचा विचार चांगला असला तरी त्यात विद्यार्थी हिताचा विचार हवा. अन्यथा देशात वर्गसंघर्ष आणि सामान्यांना शिक्षण न परवडण्याचा धोका वाढेल. इथे परदेशी विद्यापीठांची बेटे तयार होतील. शिवाय जागतिक दर्जाची किती विद्यापीठे भारतात येतील, हा प्रश्न आहेच. सध्या बाजारू विद्यापीठे येण्याची भीती अधिक आहे, अशा शब्दात विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना नव्या धोरणकर्त्यांना सावधगिरीचा इशारा दिला.

प्रश्न - या स्थितीत परदेशी विद्यापीठांना काय पर्याय आहे?
परदेशी विद्यापीठांमुळे सर्वांना शिक्षण परवडणे अवघड होईल. त्यातून समस्या वाढतील. विद्यार्थी हिताचा विचार व्हायला हवा. प्रतिष्ठित विद्यापीठे येण्यास अनुत्सुक असतील, तर बाजारू विद्यापीठे याचा फायदा उठवतील. आपल्याकडे नालंदा, तक्षशिलामध्ये जगभरातून विद्यार्थी येत. तशी व्यवस्था पुन्हा उभी करण्याचा विचार व्हायला हवा.

प्रश्न - जागतिक क्रमवारीत
आपण मागे आहोत?
कोण ठरवते क्रमवारी? शिक्षण गुणवत्तेचे सर्वमान्य निकष आहेत. अमेरिका-युरोपमध्ये ते काही वेगळे नाही. येथील शिक्षण जागतिक दर्जाचे व्हायला हवे. जागतिक क्रमवारीचे क्रमवारीचे मार्केर्टिंंग कुणी केले? त्यावर अमेरिका-चीनच्या सिस्टमचा प्रभाव आहे. भारताला हिणवणे सुरू झाले. आपल्यावरही दबाव वाढला. त्यामुळे नवी योजना तयार झाली. गुणवत्तावाढीऐवजी रॅट रेसमध्ये सामील झाले. त्यातून दिखाऊपणा वाढला. सरकारी मदत विद्यापीठांना दिली गेली. पण आपल्या समस्या सोडवण्यास विद्यापीठे सक्षम झाली का?

प्रश्न- नव्या शैक्षणिक धोरणात सरकारने
केलेल्या तरतुदींबाबत काय मत आहे?
उच्च शिक्षणात
बदल, प्रस्तावित
मल्टिसेंट्रीक शिक्षणामुळे आपले ध्येय साधता येईल. रँकिंग रेसऐवजी देशांची गरज औळखून आपली विद्यापीठे उभी राहिली पाहिजे. विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शेती प्रश्न कळतो? खरीप-रब्बीमधील फरक सांगता येतो? कोणतीही विद्याशाखा देशाची गरज व समस्या सोडवणारी हवी. प्रस्तावित बहुशाखा अभ्यासामुळे हा बदल होण्याची आशा आहे.

प्रश्न - आपल्याकडे संशोधनाविषयी
कमालीची उदासीनता दिसून येते?
कारण अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये विद्याथी
तयार होत नाही. पदवी घेतल्याने नोकरी मिळणार नाही हे माहित असल्याने विद्यार्थी पदवुत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतो. त्यातूनच पुढे पीएचडी केली जाते. फेलोशिप मिळते. जगात सर्वाधिक संख्येने भारतात शिष्यवृत्ती दिली जाते, पण संशोधनात आपण खूप मागे आहोत. कारण विद्यार्थ्यांची क्षमता, गरज, आवड घेऊन शैक्षणिक प्रगतीचा कधीही विचार झाला नाही. प्रस्तावित राष्ट्रीय संशोधन परिषदेने याचाच गांभीर्याने विचार केला पाहिजे.

Web Title: Foreign universities will make education in the country unaffordable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.