ग्लोबल वॉर्मिंगमुळे जग हैराण, भारतात मात्र वाढली हिरवळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 11:12 IST2024-12-22T11:09:20+5:302024-12-22T11:12:52+5:30
वन आणि झाडांचे क्षेत्र १,४४५ चौरस किमीने वाढले

ग्लोबल वॉर्मिंगमुळे जग हैराण, भारतात मात्र वाढली हिरवळ!
नवी दिल्ली: वाढत्या प्रदूषणाने आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगमुळे जग हैराण असताना भारतातील हिरवळ मात्र वाढत आहे. सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या 'इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट २०२३'नुसार भारतातील वन आणि झाडांचे क्षेत्र २०२१ च्या तुलनेत २०२३ मध्ये १,४४५ चौरस किमीने वाढले आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते देहरादून येथील वनसंशोधन संस्था येथे या रिपोर्टचे प्रकाशन करण्यात आले. या भारतीय वन सर्वेक्षण (एफएसआय) द्वारे हा अहवाल तयार केला जातो. उपग्रह रिमोट सेन्सिंग डेटा आणि क्षेत्र-आधारित राष्ट्रीय वनसूचीच्या आधारे देशातील वन आणि वृक्षांच्या संसाधनांचे एफएसआय सखोल मूल्यांकन करते. या अहवालानुसार देशातील एकूण वन आणि वृक्ष क्षेत्र ८,२७,३५७ चौ. किमी (देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २५.१७%) आहे. यामध्ये वन क्षेत्र ७,१५,३४३ चौ. किमी (२१.७६%) असून वृक्ष क्षेत्र १,१२,०१४ चौ. किमी (३.४१%) आहे.
एकूण वन आणि वृक्ष क्षेत्रात आघाडीवर असलेली राज्ये :
मध्य प्रदेश ८५,७२४ चौ. किमी
अरुणाचल प्रदेश ६७,०८३ चौ. किमी.
वन क्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेली राज्ये
मिझोराम २४२ चौ.किमी
गुजरात १८० चौ.किमी.
महाराष्ट्र ६५,३८३ चौ. किमी.
ओडिशा १५२ चौ. किमी.