निधीअभावी पद्मालय परिसराचा वन पर्यटन विकास रखडला

By admin | Published: October 14, 2015 09:02 PM2015-10-14T21:02:51+5:302015-10-14T23:00:05+5:30

एरंडोल : तालुक्यातील पद्मालय परिसराच्या वनपर्यटन विकासासाठी २०१४-१५ मध्ये नव्याने विकास निधी उपलब्ध न झाल्यामुळे विकास कामे रेंगाळली आहेत.

The forest tourism development of Padmaya area has stalled due to lack of funds | निधीअभावी पद्मालय परिसराचा वन पर्यटन विकास रखडला

निधीअभावी पद्मालय परिसराचा वन पर्यटन विकास रखडला

Next

एरंडोल : तालुक्यातील पद्मालय परिसराच्या वनपर्यटन विकासासाठी २०१४-१५ मध्ये नव्याने विकास निधी उपलब्ध न झाल्यामुळे विकास कामे रेंगाळली आहेत.
वनपर्यटन, तार कंपाऊंड, उद्यानाची कामे, मुलांसाठी खेळायचे साहित्य उपलब्ध करणे इ. प्रमुख कामे निधी उपलब्ध झाल्यावर करणे शक्य होणार आहे.
आमदार डॉ.सतीष पाटील, जिल्‘ाचे पालकमंत्री ना.एकनाथराव खडसे यांनी पद्मालय परिसराला पर्यटन स्थळ म्हणून कसे स्वरुप प्राप्त करून देता येईल यासाठी शासन दरबारी आपले वजन खर्ची करावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
जिल्‘ात अनेक स्थळांचा पर्यटन स्थळ म्हणून वेगाने विकास झाला पण पद्मालय वनपर्यटन विकास कासव गतीने होत असल्याचा आरोप होत आहे. (वार्ताहर)

Web Title: The forest tourism development of Padmaya area has stalled due to lack of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.