रणरणत्या उन्हात वन्यप्राण्यासाठी पाणवठ्यांचा आधार यावल वनविभाग : १५ पाणवठे व १०८ सिमेंट बांधची निर्मिती

By admin | Published: April 21, 2016 11:31 PM2016-04-21T23:31:26+5:302016-04-21T23:31:26+5:30

जळगाव : जिल्हाभरात प्रत्येक दिवशी तापमानाचा उच्चांक होत आहे. दुष्काळीस्थिती, जंगलात पाण्याचा अभाव आणि वाढते तापमान यामुळे वन्यजिवांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी यावल वनविभागातर्फे १५ पाणवठे तयार केले आहेत. तर जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १०८ सिमेंट बांध तयार करण्यात आले आहे.

Forestry for forest cover for wildlife during rainy season: 15 pavement and 108 cement dam construction | रणरणत्या उन्हात वन्यप्राण्यासाठी पाणवठ्यांचा आधार यावल वनविभाग : १५ पाणवठे व १०८ सिमेंट बांधची निर्मिती

रणरणत्या उन्हात वन्यप्राण्यासाठी पाणवठ्यांचा आधार यावल वनविभाग : १५ पाणवठे व १०८ सिमेंट बांधची निर्मिती

Next
गाव : जिल्हाभरात प्रत्येक दिवशी तापमानाचा उच्चांक होत आहे. दुष्काळीस्थिती, जंगलात पाण्याचा अभाव आणि वाढते तापमान यामुळे वन्यजिवांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी यावल वनविभागातर्फे १५ पाणवठे तयार केले आहेत. तर जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १०८ सिमेंट बांध तयार करण्यात आले आहे.
चिंकारा, रानडुक्कर, अस्वलांचा संचार
तापमान सतत वाढत असताना तहान भागवणारे हे पाणवठे वन्य प्राण्यांसाठी वरदानच ठरत असतात. सातपुड्याच्या कुशीत असलेल्या यावल वनविभागत २८४४.४४ चौ.कि.मी.वनक्षेत्र आहे. त्यात ६४ गाव परिसरात ८९७.०५ चौ.कि.मी.क्षेत्रात यावल वनविभागाचे क्षेत्र आहे. तर वन्यजीव विभागाचे १७५.५८ चौ.कि.मी.वनक्षेत्र आहे. सर्व बाजूने वेढलेल्या जंगलात ससा, कोल्हा, लांडगा, चिंकारा, भेडकी, रानडुक्कर, अस्वल, मोर, चितळ, बिबट, तडस या वन्यप्राण्यांचा मुक्त संचार असतो.

नदी-नाले कोरडे ठाक
यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे नदी-नाले कोरडे पडले आहेत. अशात जंगलात रहाणार्‍या वन्य प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो आणि ही जंगली श्वापदे गावाच्या दिशेने वळायला लागतात. पाण्याच्या शोधात जनावरे बरेचदा विहिरीत पडल्याच्या घटनाही अनेकदा घडतात. तहानेने व्याकूळ श्वापदांना वन्य विभागाने कृत्रिम पाणवठे तयार करून पाणी उपलब्ध करण्यात येत आहे. या पाणवठ्यांवर कुठे बोरवेल मधून तर कोठे टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

जलयुक्त शिवार अंतर्गत १०८ सिमेंट बांध
कृत्रिम पाणवठ्यांसोबत यावल वनविभागातर्फे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत वनक्षेत्रात सिमेंट नाला बांध तयार करण्यात येत आहेत. त्यात रावेर तालुक्यातील वनक्षेत्रात ८३, चोपडा तालुक्यात २१ तर यावल तालुक्यात ४ सिमेंट नाला बांध तयार करण्यात आले आहेत.

१५ ठिकाणी कृत्रिम व नैसर्गिंक पाणवठे
प्राण्यांची तहान भागवण्यासाठी वनविभागातर्फे तब्बल १५ ठिकाणी पानवठे तयार करण्यात आले आहे. त्यात वैजापूर वनक्षेत्रातील मालापूर, खार्‍यापाडा पश्चिम, देवझिरी - हंड्याकुंड्या, रावेर- पाल, चोपडा -सत्रासेन, चौगांव उ., मोरचिडा, कर्जाणा- वर्डी, यावलपूर्व- डोंगरकठोरा भागात पाच पानवठे तयार केले आहेत. तर यावल पश्चिम वनक्षेत्रातील मनुदेवी पश्चिम वाघझिरा येथे पाणवठा तयार केला आहे.

कोट
दुष्काळीस्थिती आणि वाढते तापमान या गोष्टी लक्षात घेऊन यावल वनक्षेत्रात १५ पाणवठे व १०८ सिमेंट नालाबांध तयार करण्यात आले आहे. यासह नैसर्गिक पाणवठे तयार करून त्यात वन्यप्राण्यांसाठी पाणी साठविले जात आहे.
एस.एस.दहिवले, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग.

Web Title: Forestry for forest cover for wildlife during rainy season: 15 pavement and 108 cement dam construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.