2019 विसरा आणि 2024च्या तयारीला लागा- ओमर अब्दुल्ला

By admin | Published: March 11, 2017 06:18 PM2017-03-11T18:18:53+5:302017-03-11T18:24:21+5:30

मोदींचं हे अभूतपूर्व यश पाहून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली

Forget the 2019 and prepare for 2024 - Omar Abdullah | 2019 विसरा आणि 2024च्या तयारीला लागा- ओमर अब्दुल्ला

2019 विसरा आणि 2024च्या तयारीला लागा- ओमर अब्दुल्ला

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11- पाच राज्यांतील निवडणुकांचे कल जवळपास हाती आले आहेत. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अद्यापही मोदी लाट कायम असल्याचं या राज्यांच्या निकालावरून स्पष्ट झालं. उत्तर प्रदेशात तर भाजपाच्या विरोधात असलेल्या समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष यांचा सुपडासाफ झाला आहे. त्यानंतर मोदींचं हे अभूतपूर्व यश पाहून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, 2019 विसरून 2024च्या निवडणुकीची तयारी करायला हवी, सध्या संपूर्ण भारतात मोदींसारखा दुसरा नेता नाही. असा कोणताही नेता नाही जो 2019मध्ये मोदी आणि भाजपाला टक्कर देऊ शकेल. उत्तर प्रदेशातील मोदी लाट तज्ज्ञ आणि विश्‍लेषक कसे काय विसरले ? हे छोट्या डबक्‍यातील तरंग नाही तर त्सुनामी आहे, असे ट्‌विटही ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे. 
(स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी हे सर्वात ताकदवान नेते - अमित शाह)
(प्रशांत किशोर यांच्या रणनीतीला अपयश, करिअरवर टांगती तलवार)
उत्तर प्रदेशात समाजवादी आणि काँग्रेसची आघाडी झाली असली तरी  मोदींनी 24 रॅली करून जोरदार प्रचार केला होता. त्यामुळेच उत्तर प्रदेशात भाजपाला घवघवीत यश मिळालं आहेत. तसेच शेजारील राज्य उत्तराखंडही भाजपानं जिंकलं आहे. मात्र पंजाबमध्ये 10 वर्षांनी काँग्रेस पुन्हा सत्तेत आली आहे. तसेच गोव्यातही प्रतिस्पर्धी भाजपावर मात करत काँग्रेस बहुमत मिळवण्याच्या जवळपास पोहोचली आहे. मात्र भाजपाचं हे यश दुर्लक्षित करण्यासारखं नसल्याचंही ते म्हणाले आहेत. मतदारांना एक चांगला पर्याय देण्याची गरज असल्याचंही मी आधीही म्हणालो आणि यानंतरही तेच सांगेन, असंही ओमर अब्दुल्ला म्हणाले आहेत.

Web Title: Forget the 2019 and prepare for 2024 - Omar Abdullah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.