‘त्या’ खात्यातील २ अब्ज डॉलर्सचा विसर
By admin | Published: March 7, 2016 03:03 AM2016-03-07T03:03:49+5:302016-03-07T03:03:49+5:30
विदेशी लष्करी विक्री कार्यक्रमांतर्गत अमेरिकेला दिलेली २.३ अब्ज अमेरिकन डॉलर्सची रक्कम कोणत्याही व्याजाविना अमेरिकेच्या खात्यात पडून असल्याचे आढळून आले आहे.
नवी दिल्ली : विदेशी लष्करी विक्री कार्यक्रमांतर्गत अमेरिकेला दिलेली २.३ अब्ज अमेरिकन डॉलर्सची रक्कम कोणत्याही व्याजाविना अमेरिकेच्या खात्यात पडून असल्याचे आढळून आले आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी ही माहिती उघड केली.
अमेरिकेसोबत आता आर्थिक व्यवहार प्रक्रियेत चांगला सूर जुळला असून प्रत्येक तीन महिन्यांत लष्करी खरेदीसंबंधी बिले निघत आहेत. विविध खरेदीच्या रकमा एकाच निधीत जमा होतात. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये हा निधी तयार करण्यात आला, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले. मंत्रालयाने पडून असलेल्या सदर रकमेबाबत निवेदन जारी केले असून कंत्राटासंबंधी औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम काढून घेतली जाणार असल्याचे त्यात स्पष्ट केले आहे. रक्कम खात्यात पडून असल्यामुळे २०१५-१६ या वर्षातील गत सहा महिन्यांत कंत्राटाबाबत रक्कम देण्याची आवश्यकता भासली नव्हती.