टिश्यू कल्चर नर्सरीतून दुर्मीळ रोपांची निर्मिती सामाजिक वनीकरण : बांबू, वड, चंदनाच्या दुर्मीळ रोपांची निर्मिती
By admin | Published: August 9, 2016 10:03 PM2016-08-09T22:03:06+5:302016-08-09T22:03:06+5:30
जळगाव : सामाजिक वनीकरण विभागातर्फे कुंभारखोरी भागात ३ हेक्टर क्षेत्रात हायटेक नर्सरी साकारण्यात येत आहे. प्रत्येक वर्षाला यात पाच लाख दुर्मीळ रोपांची निर्मिती करण्यात येणार आहे.
Next
ज गाव : सामाजिक वनीकरण विभागातर्फे कुंभारखोरी भागात ३ हेक्टर क्षेत्रात हायटेक नर्सरी साकारण्यात येत आहे. प्रत्येक वर्षाला यात पाच लाख दुर्मीळ रोपांची निर्मिती करण्यात येणार आहे.बांबू वनात विविध प्रजातींची लागवडकोल्हे हिल्स परिसरातील कुंभारखोरी भागातील १५ हेक्टर क्षेत्रावर जैव विविधता उद्यान तयार केले जात आहे. या उद्यानांतर्गत बांबू वन उभारण्यात येणार आहे. यात बांबूसा टुल्डा, बांबूसा बाल्कोआ, बांबूसा बांबोस, बांबूसा न्यूटन्स, बांबूचा व्हल्गॅरीस, डेण्ड्रोकॅलॅमस हॅमिल्टोनी, बांबूसा पलिडा, डेण्ड्रोकॅलॅमस जिजेंटस, डेण्ड्रोकॅलॅमस अस्पर, डेण्ड्रोकॅलॅमस स्ट्रक्टिस या प्रजातींची लागवड करण्यात येणार आहे.टिश्यूच्या माध्यमातून ५ लाख रोपांची लागवडया हायटेक नर्सरीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला ५ लाख रोपांची निर्मिती करता येणार आहे. या नर्सरीत जी रोपे दुर्मीळ आहेत त्यांचे प्रोटोकॉल तयार करून रोपांची उगवन करण्यात येणार आहे. यात वड, चिंच, साग, बांबू, टेकोमा, ड्रेसिना, पायकस, उंबर, बांबू, कडुनिंब यांची निर्मिती करता येणार आहे.बांबूच्या रोपांसाठी हायटेक नर्सरी ठरणार वरदानबांबूच्या रोपांच्या निर्मितीसाठी सामाजिक वनीकरण विभागाला मोठे कष्ट करावे लागतात. ४० ते ५० वर्षातून एकाच वेळी या झाडांचा फुले येत असतात. त्यानंतर दुसर्या वर्षी हे बांबूचे झाड सुकते. बांबूच्या रोपाच्या निर्मितीसाठी टिश्यू कल्चरद्वारे निर्मिती हे वरदान ठरणार आहे. चंदन, वड,सागाच्या झाडासाठी ही नर्सरी महत्त्वपूर्ण असणार आहे. सव्वा कोटींचा खर्च अपेक्षितहायटेक नर्सरीसाठी तीन हजार स्केअर फुटाची टिश्यू कल्चर लॅब तयार करण्यात येणार आहे. ही संपूर्ण लॅब ही वातानुकुलित असणार आहे. यात पाच हजार स्केअर फुटाचे पॉलिहाऊस राहिल. १ हेक्टरवर शेड नेट हाऊस तयार करण्यात येणार आहे. सध्या या ठिकाणी विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच कुंपणाचे कामदेखील झाले आहे. पॉलीहाऊसच्या कामालादेखील सुरुवात झाली आहे. बिलाखेडचा जैव विविधता उद्यानाचा आराखडा तयारचाळीसगाव शहरालगत बिलाखेड जैव विविधता उद्यानाचा आराखडा सामाजिक वनिकरण विभागाचे उपसंचालक एस.डी.वाढई यांनी तयार केला आहे. यात राशी चिन्हानुसार झाडे, नवग्रहांची झाडे, अशोका वन, बांबू वन, नक्षत्र वन, नंदनवन, गणेश वन तयार होणार आहे.