भाजपाविरोधात राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रावरून माजी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये दोन गट 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 03:14 PM2019-04-12T15:14:30+5:302019-04-12T15:24:06+5:30

 भाजपाकडून सेनादलांच्या पराक्रमाचे राजकारण होत असल्याचा आरोप करत माजी सैन्यप्रमुख आणि माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र पाठवल्याचे समोर आल्याने ऐन निवडणुकीच्या मोसमात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

The former army officer has two groups in the letter sent to the President against the BJP | भाजपाविरोधात राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रावरून माजी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये दोन गट 

भाजपाविरोधात राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रावरून माजी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये दोन गट 

Next

नवी दिल्ली -  भाजपाकडून सेनादलांच्या पराक्रमाचे राजकारण होत असल्याचा आरोप करत माजी सैन्यप्रमुख आणि माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र पाठवल्याचे समोर आल्याने ऐन निवडणुकीच्या मोसमात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. मात्र आता या पत्रावरून माजी लष्करी अधिकाऱ्यांमध्येच दोन गट पडल्याचे दिसत आहे. त्यापैकी काही वरिष्ठ सैनिकी अधिकाऱ्यांनी आपण अशा प्रकारच्या पत्रावर सह्या केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. तर काही अधिकाऱ्यांनी मात्र आपण पत्र वाचल्यानंतर त्याखाली आपल्या नावाचा समावेश करण्यास परवानगी दिल्याचे मान्य केले आहे.  दरम्यान, अशा प्रकारचे कुठलेही पत्र आपल्यापर्यंत पोहोचले नसल्याचे राष्ट्रपती भवनाने म्हटले आहे. 

 पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांनी आपले मत पुलवामा हल्ल्यात शहिदांना आणि बालाकोट येथे एअरस्ट्राइक करणाऱ्या जवानांना समर्पित करावे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी लातूर येथील आपल्या सभेत केले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तसेच लष्कातील अनेक माजी अधिकाऱ्यांनीही सैन्याच्या राजकीय वापराबाबत नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, भाजपकजून भारतीय सैनिकांच्या बलिदानाचे राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला असतानाच, माजी सेना प्रमुखासह निवृत्त अधिकाऱ्यांनी याबाबत राष्ट्रपती यांना पत्र लिहल्याचे वृत्त आले होते. तीन माजी सेनाप्रमुख आणि 156 अधिकाऱ्यांनी हे पत्र लिहिल्याचे सांगण्यात येत होते. 

मात्र या पत्रात उल्लेख असलेले माजी सेना अधिकारी जनरल एस. एफ. रॉड्रिक्स यांनी तसेच माजी हवाई दलप्रमुख एन. सी. सुरी यांनी अशा प्रकारचे पत्र लिहिण्यास आणि त्यात आपल्या नावाचा समावेश करण्यास आपण सहमती दिली नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे मेजर जनरल हर्ष कक्कड यांनी आपण हे पत्र वाचल्यानंतर त्यात आपल्या नावाचा समावेश करण्यास परवानगी दिली होती असे म्हटले आहे. याशिवाय माजी लष्करप्रमुख शंकर रॉय चौधरी यांनीही अशा प्रकारचे पत्र लिहिल्याचे मान्य केले आहे.  

 

लष्करी अधिकारी एस. एफ. रॉड्रिग्स यांनी अशा प्रकारचे कुठलेही पत्र लिहिल्याची माहिती नसल्याचे म्हटले आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या नावे फिरत असलेल्या एका पत्रामध्ये एस. एफ. रॉड्रिग्स यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात येत आहे. 





माजी एअर चीफ मार्शल एन. सी. सुरी यांनीही अशा प्रकारच्या पत्रावर सही केल्याचे वृत्त फेटाळले आहे. ''हे काय चालू आहे मला माहिती नाही. मी माझ्या संपूर्ण जीवनात राजकारणापासून दूर राहिलो आहे. 42 वर्षे अधिकाऱी म्हणून काम केल्यानंतर आता हे होऊ शकत नाही. जीवनात मी नेहमी देशाला प्राधान्य दिले आहे. अशाप्रकारच्या बातम्या कोण पसरवत आहे हे मला माहित नाही. हे फेक न्यूजचे उत्तम उदाहरण आहे."' असे सुरी म्हणाले. तसेच अॅडमिरल रामदास यांनी लिहिलेले हे पत्र नसल्याचा दावाही त्यांनी केला. 






माजी उपलष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल एम. एल. नायडू यांनीही अशे पत्र लिहिण्यापूर्वी आपल्याकडून परवानगी घेतली असल्याचे किंवा आपण अशा प्रकारचे कुठले पत्र लिहिल्याचे वृत्त फेटाळले आहे. 





मात्र मेजर जनरल हर्ष कक्कर यांनी या पत्रावर आपली सही असल्याचे मान्य केले आहे. तसेच संपूर्ण विषय वाचल्यानंतरच आपण या पत्राला सहमती दिल्याचे म्हटले आहे. त्यांच्याशिवाय माजी लष्करप्रमुख शंकर रॉय चौधरी यांनीही असे पत्र लिहिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 




  

Web Title: The former army officer has two groups in the letter sent to the President against the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.