Video - ट्रेनच्या AC कोचमधून विना तिकीट प्रवास करत होता नेता; TTE ने शिकवला धडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 02:24 PM2023-10-15T14:24:10+5:302023-10-15T14:24:48+5:30
भाजपामधून हकालपट्टी करण्यात आलेले बक्सर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष राणा प्रताप सिंह हे विना तिकीट ट्रेनमधून प्रवास करताना पकडले गेले.
राणा प्रताप सिंह यांचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये राणा प्रताप यांचा जियारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये टीटीईसोबत वाद होताना दिसत आहे. विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अडवल्यावर त्यांनी टीटीईशी वाद घातला आणि त्याला धमकावलं. टीटीईने आरोपी नेता आणि त्याच्या साथीदारावर दंडही ठोठावला आहे.
भाजपामधून हकालपट्टी करण्यात आलेले बक्सर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष राणा प्रताप सिंह हे विना तिकीट ट्रेनमधून प्रवास करताना पकडले गेले. NRUCC सदस्य असल्याबद्दल त्यांच्यावर गुंडगिरी करणं, मेमो फाडणे आणि TTE सोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Former Buxar BJP president Rana Pratap Singh was traveling in the train without a ticket.
— Md Uzair khan محمد عزير خان (@ImMUK00) October 14, 2023
After which when TTE asked him for the ticket, he started teaching him the way, now it is too much. They started intimidating and teaching the law, traveling without a ticket is a crime, pic.twitter.com/HKKQ94kTPP
11 ऑक्टोबर रोजी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष 12395 अप जियारत एक्स्प्रेसच्या एसी फर्स्ट क्लास, एस-ए-वन कोचने पटनाहून बक्सरला येत होते. त्यानंतर टीटीई पंकज कुमार यांनी त्यांना विना तिकीट प्रवास करताना पकडलं. यानंतर ट्रेनमध्ये दोघांमध्ये जोरदार वाद झाला. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून टीटीईने रेल्वे कंट्रोलला माहिती दिली आणि बक्सर आरपीएफकडे सोपवलं.
टीटीईने बक्सर आरपीएफला दिलेल्या मेमोवर, राणा प्रताप सिंह आणि त्यांचा एक सहकारी योगेंद्र कुमार यांना बक्सर स्थानकावर ट्रेनमध्ये चढण्यापासून थांबवल्यामुळे आणि धमकी देण्यासह एकूण 4750 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यांना मारण्याचा आरोपही करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.