"लाल बहादुर शास्त्रीजींनंतर मी नरेंद्र मोदींसारखा नेता पाहिला नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 04:42 PM2020-06-07T16:42:30+5:302020-06-07T18:11:10+5:30
पाटणा : लाल बहादुर शास्त्रीजींनंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता पाहिला नाही, ज्यांच्या एका शब्दावर देश एक झाला. मोदीनी कोरोनाचा सामना ...
पाटणा : लाल बहादुर शास्त्रीजींनंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता पाहिला नाही, ज्यांच्या एका शब्दावर देश एक झाला. मोदीनी कोरोनाचा सामना करण्यासाठी एक जनता कर्फ्यूची हाक दिली. संपूर्ण देश एकत्र आला आणि त्याने पंतप्रधान मोदींच्या या शब्दाचा सन्मान करत काटेकोरपणे जनता कर्फ्यूचे पालन केले. मग पंतप्रधन मोदींनी भलेही दिवे लावायला सांगितले असतील अथवा टाळ्या, थाळ्या आणि घंटानाद करायला सांगितला असेल. जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहीली. काही लोक याला राजकीय प्रचार म्हणत आहेत. मात्र, त्यांना हे माहित नाही, की हा राजकीय प्रचार नसून देशाला एक करण्याची मोहीम आहे, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री व माजी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली. त्यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.
मी बिहारच्या जनतेला सांगू इच्छितो, की हे पहिल्यांदाच घडले आहे, की एका महामारीविरोधात संपूर्ण देश, सरकारे एकत्र आली आहेत. एक देश आणि एका मनाचे हे उदाहरण आहे. अनेक सर्व्हे झाले मात्र, एक गोष्ट निर्विवाद आहे. 130 कोटी जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी पाहाडासारखी उभी आहे, असेही शहा म्हणाले.
कलम 370, तीन तलाकला दिला तलाक -
देशात अनेक समस्या होत्या मोदी सरकारने त्या चुटकी सरशी सोडवल्या. ठोस पावले उचलली. भारताने सीमेवर शत्रूला चोख प्रत्त्युत्तर दिले. आमच्या सरकारने 'सबकासाथ सबका विकास' करण्याबरोबरच देशाच्या सीमाही सुरक्षित केल्या. अनेक वर्षांपासून 370ची केवळ चर्चा होत होती. मात्र, आणच्या सरकारने 370 कलम क्षणात नष्ट केले. आमच्या मुस्लीम भगिनींनाही मोदी सरकारने तीन तलाकला तलाक देऊन मोठा दिलासा दिला. न्यायालयाच्या आदेशानंतर आता राम मंदिर निर्माणाचा मार्गही प्रशस्त झाला आहे, असे शहा म्हणाले.
CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...
दिल्लीत बसून मौज केरण्यापेक्षा जनतेशी संवाद साधा, कुणी अडवलं? -
विरोधक या रॅलीचा संबंध निवडणुकीशी जोडत आहेत. मात्र, या रॅलीचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. कोरोनाच्या महामारीशी लढताना जनसंपर्क होणे अश्यक्य आहे. त्यामुळे या रॅलिच्या माध्यमाने लोकांशी जनसंपर्क साधत आहोत. विरोधकांना कुणीही आडवले नाही. ते दिल्लीत बसून मौज केरण्यापेक्षा अशा पद्धतीने लोकांशी का संवाद साधात नाहीत? असा सवाल करत भाजपचे माजी अधक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
सौदी-कुवेतमध्ये PUBGवरून पेटला वाद, 'या'मुळे मुस्लिमांमध्ये पसरलीय नाराजी!
आरजेडीवर बरसले शहा -
अमित शहा यांनी आरजेडीच्या थाळी वाजवण्याच्या अभियानाव निशाणा साधला शहा म्हणाले, अखेर पंतप्रधान मोदी यांच्या थाळी वाजविण्याच्या आवाहनाचा विरोधकांवरही परिणाम झाला आहे. ही रॅली काही निवडणूक रॅली नाही. ही व्हर्च्युअल रॅली देशातील जनतेला कोरोनाविरोधात जोडण्यासाठी आहे. मात्र, वक्रदृष्टीने पाहणारे विरोधक यावरही प्रश्नचिन्ह लावत आहेत.
आता या 'स्वस्त' औषधाने होणार कोरोनाचा 'मस्त' इलाज? गोळीची किंमत फक्त 1 रुपया
स्थलांतरित मजूर आपल्या देशाचा कणा -
स्थलांतरित मजूर आपल्या देशाचा कणा आहे. मोदी सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक एक्सप्रेस चालवण्याचे निश्चित केले. बिहारमधील मजुरांसाठी बिहार सरकारने सर्वप्रकारची व्यवस्था केली होती. त्यांना केवळ 1100 रुपयांची मदतच केली गेली नाही, तर त्यांच्या रोजगाराची तयारीही केली जात आहे. याशिवाय PDSमधून बिहारसाठी 6 हजार कोटींचे धान्यही दिले गेले, असेही शहा म्हणाले. याशिवाय शहा यांनी केंद्राकडून बिहारला मिळालेल्या आणि देशात केलेल्या इतर कामांचाही पाढा वाचला.