CBI चे माजी प्रमुख रणजित सिन्हा यांचे निधन; बिहारमध्ये शोककळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 09:09 PM2021-04-16T21:09:51+5:302021-04-16T21:10:33+5:30

Former CBI chief Ranjit Sinha died : बिहारच्या या आयपीएस अधिकाऱ्याने आपल्या कारकीर्दीत सीबीआयचे महासंचालक आणि आईटीबीपीचे डीजीसह अनेक महत्त्वाची पदे भूषविली.

Former CBI chief Ranjit Sinha dies; Mourning in Bihar | CBI चे माजी प्रमुख रणजित सिन्हा यांचे निधन; बिहारमध्ये शोककळा 

CBI चे माजी प्रमुख रणजित सिन्हा यांचे निधन; बिहारमध्ये शोककळा 

googlenewsNext
ठळक मुद्दे२२ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांची पुढील दोन वर्षे सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती

सिवान / नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे (सीबीआय) माजी प्रमुख रणजित सिन्हा यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, रणजित सिन्हा कोरोना पॉझिटिव्ह होते. बिहारच्या सिवान जिल्ह्यात राहणाऱ्या रणजित सिन्हाच्या निधनानंतर संपूर्ण जिल्ह्यात शोकांची लाट आहे. १९७४ च्या निवृत्त आयपीएस अधिकारी रणजित सिन्हा यांचे दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले आहे. बिहारच्या या आयपीएस अधिकाऱ्याने आपल्या कारकीर्दीत सीबीआयचे महासंचालक आणि आईटीबीपीचे डीजीसह अनेक महत्त्वाची पदे भूषविली.

२२ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांची पुढील दोन वर्षे सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी, सिन्हा रेल्वे संरक्षण दलाचे प्रमुख होते आणि पाटणा आणि दिल्ली सीबीआयमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते.

सीबीआय संचालकपदावर असताना रणजित सिन्हा यांच्यावर कोळसा वाटप घोटाळ्याच्या तपासावर परिणाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. १९७४ बॅचचा निवृत्त आयपीएस अधिकारी सिन्हा यांच्या संशयास्पद भूमिकेबद्दल चौकशी करण्याचे सीबीआयला सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते. या आदेशानंतर तीन महिन्यांनंतर सीबीआयने सिन्हा यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता.

Web Title: Former CBI chief Ranjit Sinha dies; Mourning in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.