माजी सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांचे निधन
By admin | Published: February 20, 2017 01:08 AM2017-02-20T01:08:51+5:302017-02-20T01:08:51+5:30
माजी सरन्यायाधीश अल्तमस कबीर (६८) यांचे रविवारी येथे एका हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
कोलकाता : माजी सरन्यायाधीश अल्तमस कबीर (६८) यांचे रविवारी येथे एका हॉस्पिटलमध्ये निधन झाले. हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दुपारी २.५२ वाजता कबीर यांनी अखेरचा श्वास घेतला.
किडनी आणि अन्य रोगांच्या उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कबीर यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा, असा परिवार आहे. न्या. कबीर यांची २९ सप्टेंबर २०१२ रोजी सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. १९ जुलै २०१३ रोजी ते निवृत्त झाले होते. कबीर यांचा जन्म १९ जुलै १९४८ रोजी झाला. १९७३ मध्ये त्यांनी पदवी मिळविली आणि जिल्हा व सत्र न्यायालय आणि कोलकाता उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली. १९९० मध्ये त्यांची कोलकाता उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती.