गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणखी अडचणीत
By Admin | Published: August 17, 2015 12:08 AM2015-08-17T00:08:04+5:302015-08-17T00:08:04+5:30
>पणजी : जैका लाचखोरी प्रकरणात गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा क्राईम ब्रँचने नोंदविला आहे. मडगावचे नगराध्यक्ष आर्थूर डिसिल्वा आणि जैकाचे सर्वेक्षण अधिकारी उदयकुमार मांडेवलकर यांच्यावर कामत यांना साथ देण्याचा ठपका ठेवून गुन्हा नोंदविला आहे. दोघांना अटक होण्याचीही शक्यता आहे.दिगंबर कामत आणि आर्थूर डिसिल्वा यांना क्राईम ब्रँचकड़ून सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. कामत यांना दुपारी चार वाजता तर डिसिल्वा यांना दुपारी बारा वाजता रायबंदर येथील क्राईम ब्रँचच्या कार्यालयात बोलावण्यात आले आाहे. १९ ऑगस्टला कामत यांच्या अटकपूर्व जामिनावर विशेष न्यायालयात निवाडा होणार आहे. (प्रतिनिधी)