माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांची प्रकृती चिंताजनक, दिल्लीतील रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 09:12 PM2017-09-20T21:12:06+5:302017-09-20T21:12:21+5:30

माजी राज्यपाल, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांना मेंदूतील रक्तस्त्रावामुळे (ब्रेन स्ट्रोक) दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

Former Chief Minister N. D. Tiwari's condition worsened, he went to Delhi's hospital | माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांची प्रकृती चिंताजनक, दिल्लीतील रुग्णालयात दाखल

माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांची प्रकृती चिंताजनक, दिल्लीतील रुग्णालयात दाखल

Next

नवी दिल्ली, दि. 20 - माजी राज्यपाल, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांना मेंदूतील रक्तस्त्रावामुळे (ब्रेन स्ट्रोक) दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
91 वर्षीय एन. डी. तिवारी यांना आज सकाळी ब्रेन स्ट्रोक आला आणि त्यांच्या अर्ध्या शरिराला लकवा मारला . सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, एन. डी. तिवारी यांना सकाळपासूनच अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर ते बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती त्यांची पुतणी मनिषी तिवारी यांनी दिली. 



दरम्यान, एन. डी. तिवारी यांनी तीनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद तर एकवेळ उत्तराखंडचे मुख्यमंत्रिपद भुषविलेले आहे.  ते केंद्रातही मंत्री होते. याचबरोबर, त्यांनी 2007 ते 2009 या काळात आंध्रप्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे.  

Web Title: Former Chief Minister N. D. Tiwari's condition worsened, he went to Delhi's hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.