“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 09:29 PM2024-11-26T21:29:37+5:302024-11-26T21:32:16+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: संजय राऊतांनी केलेल्या टीकेला माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सडेतोड शब्दांत उत्तर दिले.

former cji dy chandrachud replied and slams sanjay raut allegations on hearing cases in supreme court | “सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले

“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हे सर्वांनाच धक्कादायक होते. महाविकास आघाडीचे नेते अद्यापही त्यातून सावरताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे महायुतीचे मुख्यमंत्री कोण होणार, यावर घोडे अडलेले दिसत आहे. नवे सरकार कधी स्थापन होणार, मंत्रिमंडळ कसे असणार, कोणाकडे कोणती खाती जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच निवडणुका झाल्यावर संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यावर टीका केली होती. तर उद्धव ठाकरे यांनीही प्रचारसभांमध्ये चंद्रचूड यांना लक्ष्य केले होते. 

धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश असताना ते घटनात्मक निर्णय देऊ शकले नाहीत. त्यामुळे इतिहास त्यांना माफ करणार नाही. त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्रातील चित्र बदलले असते. तुम्हाला आता जे चित्र दिसत आहे, ते तुम्हाला नक्कीच दिसले नसते. त्यांनी निर्णय न दिल्यामुळे पक्षांतरासाठीच्या खिडक्या आणि दरवाजे ते उघडे ठेवून गेले आहेत. आतासुद्धा कुणाही कुणाला विकत घेऊ शकते. कुणीही कुठेही कशाही उड्या मारु शकते. कारण दहाव्या शेड्यूलची भीतीच राहिलेली नाही आणि न्यायमूर्तींची भीती राहिलेली नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला होता. यावर चंद्रचूड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?

९ सदस्यांचे खंडपीठ असेल किंवा ९ सदस्यांचे खंडपीठ असेल किंवा घटनापीठ असेल, आमच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी घ्यावी, हे आता एखादा राजकीय पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का, गेल्या २० वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वाची प्रकरणे प्रलंबित आहेत. माझ्या कार्यकाळात निवडणूक रोखे यावर निर्णय झाला. तो कमी महत्त्वाचा होता का, कलम ६ एच्या घटनात्मक वैधतेवर सुनावणी केली, तसेच अन्य प्रमुख याचिकांवर सुनावणी घेत निकाल देण्यात आले, ते सर्व महत्त्वाचे नव्हते का, सर्वोच्च न्यायालयात कोणत्या याचिकांवर सुनावणी व्हावी, याचे सर्वाधिकार न्यायाधीशांकडे असतात. त्यांनी पक्षावर लोकांना हायजॅक करू दिले, जो उशीर झाला आणि जो निर्णय देण्यात आला. आम्ही काम करत नाही असे दाखवा, तेव्हा हा आरोप बरोबर ठरतो. आमच्याकडे अनेक महत्त्वाची प्रकरणे होती आणि आहेत, त्यामुळे कोणत्या याचिकांवर सुनावणी घ्यायची हे सांगण्याचा अधिकार राजकीय पक्षाला नाही, असे सडेतोड उत्तर डीवाय चंद्रचूड यांनी दिले.

दरम्यान, न्यायपालिका विरोधकांची भूमिका बजावेल, असे कुणीही गृहीत धरू नये. विरोधकांप्रमाणे न्यायपालिकांनी वागावे, अशी अपेक्षाही करणे चुकीचे आहे. आम्ही फक्त कायदा, त्याची वैधता आणि घटनात्मकता पाहतो. खरी अडचण आहे की जर, त्यांचा अजेंडा फॉलो केला तर त्यांना वाटते की स्वतंत्र आहे. इलेक्ट्रॉल बॉण्डवर निर्णय दिला, अलीगढ मुस्लिम केस, मदरसा संदर्भात निर्णय दिला. अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. आम्ही त्यांच्या प्रकरणावर निर्णय दिला नाही म्हणजे दुसऱ्यांनी ठरवलेला अजेंडा आम्ही फॉलो नाही करणार. आम्ही ठरवणार की कुठल्या प्रकरणावर सुनावणी होणार. चांगले वकील, पैसा, आणि पद असल्यामुळे आम्ही त्यांच्या याचिकांवर सुनावणी घ्यावी, असे होणार नाही, असे चंद्रचूड यांनी ठामपणे सांगितले. ते एएनआयच्या मुलाखतीत बोलत होते.
 

Web Title: former cji dy chandrachud replied and slams sanjay raut allegations on hearing cases in supreme court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.