माजी कोळसा सचिवांसह इतरांवर चालणार खटला
By admin | Published: October 2, 2015 03:40 AM2015-10-02T03:40:46+5:302015-10-02T03:40:46+5:30
कोळसा खाणपट्टे वाटपातील कथित गैरव्यवहाराशी संबंधित एका प्रकरणात माजी कोळसा सचिव एच.सी गुप्ता आणि पाच अन्यविरोधात खटला चालवून आरोप निश्चित करण्याचे आदेश एका विशेष न्यायालयाने गुरुवारी दिले.
नवी दिल्ली : कोळसा खाणपट्टे वाटपातील कथित गैरव्यवहाराशी संबंधित एका प्रकरणात माजी कोळसा सचिव एच.सी गुप्ता आणि पाच अन्यविरोधात खटला चालवून आरोप निश्चित करण्याचे आदेश एका विशेष न्यायालयाने गुरुवारी दिले.
विशेष सीबीआय न्यायाधीश भरत पराशर यांनी सहा लोकांविरुद्ध फौजदारी कट, फसवणूक, लोकसेवकांद्वारे फौजदारी विश्वासघात अशा कलमांनुसार व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीअंतर्गत खटला चालविण्याचे आदेश दिले. या सहाजणांमध्ये गुप्ता
यांच्यासह कोळसा मंत्रालयातील तत्कालीन संयुक्त सचिव के.एस. क्रोफा, याच मंत्रालयातील तत्कालीन संचालक (कोळसा वाटप-१) केसी समरिया, आरोपी कंपनी कमल स्पोंज स्टिल अॅण्ड पॉवर लिमिटेड, या कंपनीचे प्रबंध संचालक पवनकुमार अहलुवालिया, चाटर्ड अकाऊंटंट अमित गोयल यांचा समावेश आहे. न्यायालयाने आरोपींविरुद्ध औपचारिकरीत्या आरोप निश्चितीसाठी १४ आॅक्टोबर ही तारीख निश्चित केली. मध्य प्रदेशात कमल स्पोंज स्टिल अॅण्ड पॉवर लिमिटेड या कंपनीस थेसगोरा-बीरुद्रपुरी कोळसा पट्टा वाटपातील कथित गैरप्रकारासंदर्भातील हे प्रकरण आहे.