माजी भाग शिक्षणाधिकारी सुभाष राणे यांचे निधन.
By Admin | Published: September 9, 2015 01:42 AM2015-09-09T01:42:34+5:302015-09-09T01:42:34+5:30
डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा स्थानिकांचाआरोप.
ड क्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा स्थानिकांचाआरोप.मडगाव : सेवानिवृत्त भाग शिक्षणाधिकारी व बाळ्ळी येथील खासगी प्राथमिक शाळेचे व्यवस्थापक सुभाष राणे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. राणे यांच्या छातीत कळा येत असल्यामुळे त्यांना सोमवारी रात्री एक वाजता बाळ्ळीच्या आरोग्य केंद्रात दाखल केले होते. डॉक्टरांनी राणे यांना सुमारे दोन तास न पाहता तसेच ठेवल्यामुळे त्यांचा आजार बळावला व त्यामुळेच त्यांना मृत्यू आल्याचा आरोप करून राणे यांच्या नातेवाईकांनी व स्थानिकांनी बाळ्ळी आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांशी हुज्जत घालून गोंधळ घातला. राणे यांना एक वाजता आरोग्य केंद्रात दाखल केले होते. मात्र, रात्री तीन वाजता डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिसिओ इस्पितळात हलविण्यास सांगितले. मडगावच्या हॉस्पिसोओ इस्पितळात पोहचण्याआधीच त्यांना वाटेवरच मृत्यूने गाठले.मूळ कारवारचे असलेले व सध्या कुंकळ्ळीत राहात असलेले सुभाष राणे सरकारी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले होते. त्यांना नंतर भाग शिक्षणाधिकारी म्हणून बढती मिळाली होती. केपेचे भाग शिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवृत झाल्यावर ते गेल्या तीन वर्षांपासून बाळ्ळीच्या खासगी शाळेत व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. विद्यार्थीप्रिय व शिस्तप्रिय शिक्षक म्हणून नाव मिळविलेले राणेसर अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे शिक्षण अधिकारी होते. त्यांच्या अकाली जाण्याने कुंकळ्ळी व केपे भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सुभाष राणे यांचा मृत्यू झाल्याचा अरोप स्थानिकांनी केला असून आरोग्य खात्याने यावर चौकशी करावी व त्या संबंधित डॉक्टरांची त्वरित बदली करावी, अशी मागणी लोकांनी केली आहे.(प्रतिनिधी)