तुझ्यावर प्रेम केलंय, तुला सोडणार नाही, माजी प्रेयसीची भाजपा आमदाराला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 10:09 AM2018-06-22T10:09:11+5:302018-06-22T10:09:11+5:30

मी त्यांच्यावर प्रेम केलंय, जिवंत असेपर्यंत त्यांना सोडणार नाही, असे सांगत एका महिलेने गुरुवारी भाजपा आमदाराच्या कार्यालयात गोंधळ घातला.

Former girlfriend threatens the BJP MLA | तुझ्यावर प्रेम केलंय, तुला सोडणार नाही, माजी प्रेयसीची भाजपा आमदाराला धमकी

तुझ्यावर प्रेम केलंय, तुला सोडणार नाही, माजी प्रेयसीची भाजपा आमदाराला धमकी

म्हैसूर - मी त्यांच्यावर प्रेम केलंय, जिवंत असेपर्यंत त्यांना सोडणार नाही, असे सांगत एका महिलेने गुरुवारी भाजपा आमदाराच्या कार्यालयात गोंधळ घातला. तिने कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केले. तसेच कार्यालयात उपस्थित नसलेल्या आमदारांना धमकीही दिली. मात्र या आमदाराच्या निकटवर्तीयांना ही महिला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार म्हैसूर विभागातील कृष्णाराजा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपा आमदार  एस. ए. रामदास यांना भेटण्यासाठी एक महिला काल त्यांच्या कार्यालयात आली. रामदास यांची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या या महिलेने त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र आमदार कार्यालयात नसल्याचे कळताच तिने आरडाओरड करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या महिलेची ओळख प्रेमाकुमारी अशी झाली आहे.


संतापलेल्या प्रेमाकुमारीने कार्यालयात उपस्थित असलेल्यांना शिविगाळ करून गैरवर्तन केले. तसेच "मी जोपर्यंत जिवंत आहे. तोपर्यंत रामदासला सोडणार नाही. मी एका प्रतिष्ठित घरातील महिला आहे. मी त्याला सोडणार नाही. मी रामदासवर प्रेम करते. म्हणूनच निवडणुकीत त्याच्या विरोधातील उमेदवारी अर्ज मागे घेतला. मी सातत्याने त्याल भेटण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तो माझा फोन उचलत नाही आहे. मी त्याला सोडणार नाही," अशी धमकी या महिलेने दिली.  
दरम्यान, सदर महिला आमदार रामदास यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आंदाज एका राजकीय विश्लेषकाने व्यक्त केला आहे. रामदास यांच्यासोबत विवाह केल्याचा दावा ही महिला करते. मात्र त्यासंदर्भात तिच्याकडे कुठलाही पुरावा नाही. त्यावरून ही महिला पैसे उकळण्यासाठी हे आरोप करत असल्याचे निष्पन्न होते, असे त्यांनी म्हटले आहे.  कोशिश में है।' 

Web Title: Former girlfriend threatens the BJP MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.