'गोध्रा हत्याकांडाप्रमाणेच पुलवामा हल्लादेखील भाजपाच्या कारस्थानाचा भाग'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 10:23 AM2019-05-02T10:23:57+5:302019-05-02T10:26:46+5:30

गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक आरोप

former gujarat cm shankersinh vaghela said pulwama attack was bjps conspiracy just like godhra | 'गोध्रा हत्याकांडाप्रमाणेच पुलवामा हल्लादेखील भाजपाच्या कारस्थानाचा भाग'

'गोध्रा हत्याकांडाप्रमाणेच पुलवामा हल्लादेखील भाजपाच्या कारस्थानाचा भाग'

googlenewsNext

नवी दिल्ली: गोध्रा हत्याकांडाप्रमाणेच पुलवामातला दहशतवादी हल्लादेखील भाजपाच्या कारस्थानाचा भाग असल्याचा गंभीर आरोप गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेलांनी केला. पुलवामातल्या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या गाडीची नोंद गुजरातमध्ये करण्यात आली होती, असा दावादेखील त्यांनी केला. गोध्रा हत्याकांडदेखील भाजपाचं षडयंत्र होतं. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाकडून दहशतवादाचा आधार घेतला जातो, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. 

बालाकोटमध्ये करण्यात आलेला एअर स्ट्राइक भाजपानं अगदी नियोजितपणे केलेला हल्ला होता, असा दावा वाघेला यांनी केला. 'बालाकोटवर करण्यात आलेल्या हल्ल्यात कोणीही मारलं गेलं नाही. एअर स्ट्राइकमध्ये 200 जण मारले गेले नाहीत, हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेनं सांगितलेलं नाही,' असं वाघेला म्हणाले. पुलवामा हल्ल्याची माहिती असूनही तो हल्ला होऊ दिला गेला, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. 'गुप्तचर विभागानं पुलवामात हल्ला होणार असल्याची माहिती दिली होती. मात्र तरीही हल्ला रोखण्यासाठी पावलं उचलण्यात आली नाहीत,' असा गंभीर आरोप त्यांनी केला. 

बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकबद्दल वाघेला यांनी काही सवाल उपस्थित केले. 'बालाकोटमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांची माहिती सरकारकडे आधीपासूनच होती. मग तिथे आधीच कारवाई का करण्यात आली नाही? पुलवामात हल्ला होण्याची वाट का पाहिली गेली?,' असे प्रश्न त्यांनी विचारले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात मॉडेलवरही वाघेलांनी भाष्य केलं. 'भाजपाचं गुजरात मॉडेल खोटं आहे. गुजरातमध्ये अनेक अडचणी आहेत. राज्य संकटातून जात आहे. राज्यातले भाजपा नेते नाराज आहेत,' असा दावा वाघेलांनी केला. 
 

Web Title: former gujarat cm shankersinh vaghela said pulwama attack was bjps conspiracy just like godhra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.