"अरविंद केजरीवालांनी ९ वर्षांत दिल्लीसाठी काहीही केले नाही", गौतम गंभीरचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 05:00 PM2023-07-14T17:00:55+5:302023-07-14T17:01:17+5:30

राजधानी दिल्ली येथील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने ४५ वर्षांचा विक्रम मोडला आहे.

Former Indian cricketer and BJP MP Gautam Gambhir has criticized Aam Aadmi Party president and Delhi Chief Minister Arvind Kejriwal for not doing anything for Delhi in 9 years  | "अरविंद केजरीवालांनी ९ वर्षांत दिल्लीसाठी काहीही केले नाही", गौतम गंभीरचा हल्लाबोल

"अरविंद केजरीवालांनी ९ वर्षांत दिल्लीसाठी काहीही केले नाही", गौतम गंभीरचा हल्लाबोल

googlenewsNext

delhi floods 2023 : राजधानी दिल्लीवर सध्या ओल्या दुष्काळाचे सावट आहे. यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने ४५ वर्षांचा विक्रम मोडला असून सोमवारपासून यमुनेच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अशा स्थितीत हातिनीकुंड बॅरेजमधून १ लाख ५३ हजार ७६८ क्युसेक पाणी सोडण्यात आल्यानंतर यमुनेच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांवर मोठे संकट ओढावले आहे. स्थानिक लोक जीव वाचवण्यासाठी इतर भागात स्थलांतरित होत आहेत. राजकीय मंडळी एकमेकांवर आरोप करत असून दिल्लीतील ओल्या दुष्काळावरून भाजपा आणि आम आदमी पार्टीमध्ये सामना रंगला आहे. भाजपाचे खासदार गौतम गंभीरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले आहे.

दिल्लीत मागील नऊ वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीचे सरकार आहे. याचाच दाखला देत भारताचा माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान खासदार गंभीरने केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली. "दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मागील नऊ वर्षात प्रचारावर किती पैसा खर्च केला आणि पायाभूत सुविधांवर किती खर्च झाला हे सांगावे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा खरा चेहरा आज उघड झाला असून त्यांनी ९ वर्षांत दिल्लीसाठी काहीही केले नाही. ते पंतप्रधानांच्या परदेशी दौऱ्यावर बोलतात पण पाणी शहरात का शिरले याबद्दल उघडपणे बोलत नाहीत", अशा शब्दांत गंभीरने केजरीवालांवर टीकास्त्र सोडले. 

पावसाचा हाहाकार 
उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरयाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. राजस्थानच्या वाळवंटी राज्यापासून ते डोंगराळ राज्यांपर्यंत, गंगा, यमुना आणि बियाससह सर्व प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेकांच्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. हजारो हेक्टरवरील पिकं नष्ट झाली आहेत. डोंगरावर पावसाचा कहर आहे. हिमाचलच्या कुल्लू पर्यटन स्थळांमध्ये मनाली, मणिकर्णा आणि बंजारमध्ये १७,००० पर्यटक अडकले आहेत. चार धाम यात्राही विस्कळीत झाली आहे.
 

Web Title: Former Indian cricketer and BJP MP Gautam Gambhir has criticized Aam Aadmi Party president and Delhi Chief Minister Arvind Kejriwal for not doing anything for Delhi in 9 years 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.