जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत, 'या' कारणामुळे कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 12:28 PM2021-09-29T12:28:30+5:302021-09-29T12:28:55+5:30

पुलवामा येथील एका पीडित कुटुंबाला जात असताना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

Former Jammu and Kashmir Chief Minister Mehbooba Mufti under house arrest | जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत, 'या' कारणामुळे कारवाई

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत, 'या' कारणामुळे कारवाई

googlenewsNext

श्रीनगर:पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) च्या अध्यक्षा आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. त्राल पुलवामा येथील एका कुटुंबाने लष्कराने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला होता. याच कुटुंबाला भेटण्यासाठी मेहबूबा जात होत्या. पण, पण त्यांना आपल्या घराबाहेर पडू दिले नाही.

याबाबत स्वतः मेहबूबा मुफ्ती यांनी माहिती दिली आहे. आपल्या ट्विटरवर त्या म्हणाल्या की, "त्रालमध्ये लष्कराने कथितपणे लुटलेल्या गावाला भेट देण्यासाठी जात असताना मला पुन्हा माझ्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं. हे आहे काश्मीरचे खरे चित्र.''

घाटीत पत्रकारांचे शोषण केल्याचा आरोप
मेहबूबा मुफ्ती सतत केंद्रावर हल्ला करत आहेत. कालच त्यांनी खोऱ्यातील पत्रकारांच्या शोषणाचे आरोप केले आहेत. त्यांनी यासंदर्भात प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाला (पीसीआय) पत्र लिहून स्वतंत्र तथ्य शोधक पथक जम्मू-काश्मीरला पाठवण्याची मागणी केली आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या पत्रात म्हटले की, 'भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क यासारख्या मूलभूत अधिकारांवर हल्ला झाला आहे.' 

Web Title: Former Jammu and Kashmir Chief Minister Mehbooba Mufti under house arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.