जेट एअरवेजचे माजी सीईओ सुरू करणार स्वस्त विमानसेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 05:16 AM2021-02-13T05:16:31+5:302021-02-13T07:59:27+5:30

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाेघेही विमान वाहतूक कंपनी स्थापन करण्याच्या दृष्टीने सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.

Former Jet Airways CEO top Executive mull launch low cost carrier | जेट एअरवेजचे माजी सीईओ सुरू करणार स्वस्त विमानसेवा

जेट एअरवेजचे माजी सीईओ सुरू करणार स्वस्त विमानसेवा

Next

नवी दिल्ली : जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे आणि वरिष्ठ अधिकारी प्रवीण अय्यर यांनी स्वस्त विमानसेवा सुरू करण्याची याेजना आखली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाेघेही विमान वाहतूक कंपनी स्थापन करण्याच्या दृष्टीने सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.

पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत विमानसेवा लॉन्च करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. सहा महिन्यांमध्ये याेजनेला ते अंतिम स्वरूप देऊन परवान्यासाठी अर्ज करतील. मात्र, उड्डाणांसाठी मेट्राे मार्गाची निवड करतील अथवा प्रादेशिक मार्ग, याबाबत स्पष्टता नाही. दुबे हे एप्रिल २०१९ पर्यंत जेट एअरवेजचे सीईओ हाेते. अय्यर हे त्यांचे सहकारी हाेते. 

नवी विमान कंपनी स्थापन करण्यामध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक कारणीभूत ठरताेय, ताे म्हणजे विमानांचे कमी असलेले भाडे. सध्या विमानांचे भाडे २० ते २५ टक्के कमी आहे. इतर खर्चही कमी झाले आहेत. 

Web Title: Former Jet Airways CEO top Executive mull launch low cost carrier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.