झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भाजपात जाहीर प्रवेश; पक्षाला किती फायदा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 06:20 PM2024-08-30T18:20:23+5:302024-08-30T18:21:15+5:30

Champai Soren News : चंपाई सोरेन यांच्या रुपात भाजपकडे मोठा आदिवासी चेहरा आला आहे.

Former Jharkhand Chief Minister Champai Soren joins BJP | झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भाजपात जाहीर प्रवेश; पक्षाला किती फायदा होणार?

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भाजपात जाहीर प्रवेश; पक्षाला किती फायदा होणार?

Champai Soren Join BJP :झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन (Champai Soren) यांनी आज (30 ऑगस्ट) भारतीय जनता पक्षात (BJP) जाहीर प्रवेश केला आहे. झारखंड मुक्ती मोर्चासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. मात्र, डॅमेज कंट्रोलसाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी शुक्रवारीच रामदास सोरेन (Ramdas Soren) यांना राज्य सरकारमध्ये मंत्री केले आहे.

चंपाई सोरेन यांच्या पक्षप्रवेशासाठी रांची येथील शाखेच्या मैदानावर भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर निवडणूक प्रभारी शिवराज सिंह चौहान, निवडणूक सहप्रभारी हिमंता बिस्वा शर्मा, प्रदेशाध्यक्ष बाबू लाल मरांडी आणि झारखंड भाजपचे सर्व नेते उपस्थित होते. यावेळी मंचावर चंपाई सोरेन यांचा मुलगा बाबूलाल सोरेनदेखील उपस्थित होते.

चंपाई सोरेन यांनी का सोडला पक्ष?
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना एका आर्थिक खटल्यात तुरुंगात जावे लागले होते. यामुळे त्यांनी चंपाई यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपवले. पण, पाच महिन्यानंतर जामीन मिळताच ते चंपाई यांना बाजुला सारत मुख्यमंत्रिपदावर बसले. या निर्णयामुळे चंपाई सोरेन खूप नाराज होते. 

चंपाई सोरने यांच्यामुळे भाजपचा फायदा?
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी चंपाई सोरेन भाजपसाठी खुप फायद्याचे ठरू शकतात. चंपाई सोरेन हे शिबू सोरेन यांच्यासह झारखंड चळवळीचे एक मजबूत नेते आहेत. राज्यातील अनेक विधानसभा जागांवर त्यांचा प्रभाव आहे. यामध्ये कोल्हाण प्रदेश प्रमुख आहे. झारखंडमधील विधानसभेच्या 81 जागांपैकी 28 जागा आदिवासी समाजासाठी राखीव आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपची कामगिरी निराशाजनक होती. 28 जागांपैकी भाजपला फक्त दोनच जागा मिळाल्या होत्या. झारखंडमध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या लोकसभेच्या पाचही जागांवरही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळेच आता चंपाई सोरेन यांच्यासारखे नेते भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. 

Web Title: Former Jharkhand Chief Minister Champai Soren joins BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.