“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 22:51 IST2024-04-27T22:50:11+5:302024-04-27T22:51:36+5:30
Markandey Katju News: असे केल्याने त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही आणि देशाचीही त्यांच्यापासून सुटका होईल. हरि ओम, असे मार्कंडेय काटजू यांनी म्हटले आहे.

“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
Markandey Katju News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा धडाका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका करत आहे. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे तीव्र होताना दिसत आहेत. यातच माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान मोदींवर खोचक शब्दांत टीकास्त्र सोडले आहे.
नरेंद्र मोदी यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा आणि त्यानंतर पापांचे प्रायश्चित्य करण्यासाठी त्यांना हिमालयात पाठवून दिले पाहिजे. असे केल्याने त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही आणि देशाचीही त्यांच्यापासून सुटका होईल. हरि ओम, अशी एक पोस्ट मार्कंडेय काटजू यांनी एक्सवर केली आहे.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये काटजू म्हणतात की, हे राम! हिंदुस्थानातील लोक कसे आहेत ते पाहा. ज्या ५६ इंची छातीच्या विश्वगुरुंनी त्यांना आकाशापर्यंत नेले, १५ लाख रुपये सगळ्यांना दिले. त्या विश्वगुरुला ४ जूनच्या दिवशी मारुन हाकलणार आहेत. कलियुग आले आहे. नमः शिवाय, नमः शिवाय, त्राही माम त्राही माम, असा खोचक टोला एक्सवरून लगावला आहे.