लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा यांचं निधन

By admin | Published: March 4, 2016 11:16 AM2016-03-04T11:16:15+5:302016-03-04T11:46:35+5:30

लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा यांचं निधन झालं आहे. ते 68 वर्षांचे होते. दिल्लीतील राहत्या घऱी ह्रद्यविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे

Former Lok Sabha Speaker PA Sangma passed away | लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा यांचं निधन

लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा यांचं निधन

Next
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ४ - लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा यांचं निधन झालं आहे. ते 68 वर्षांचे होते. दिल्लीतील राहत्या घऱी ह्रद्यविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे. 1996 ते 1998 काळात पी ए संगमा 11 व्या लोकसभेचे अध्यक्ष होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत पी ए संगमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. मात्र 2004 मध्ये शरद पवार युपीएत समील झाल्यानंतर त्यानी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. 
 
लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभेत पी ए संगमा यांच्या निधनाची माहिती दिली. लोकसभेत पी ए संगमा यांना आदरांजली वाहिण्यात आली. आदरांजली वाहिल्यानंतर लोकसभेचं कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. लोकसभेचं कामकाज हसतमुखाने कसं कराव हे मी पी ए संगमा यांच्याकडून शिकल्याची भावना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. पी ए संगमा यांचा लोकसभा अध्यक्षपदाचा कार्यकाळ न विसरण्यासारखा असल्याचं मोदी बोलले आहेत. 
 
पी.ए. संगमा यांच्या कारकिर्दीचा आढावा – 
जन्म : 1 सप्टेंबर 1947
1973 : मेघालय युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष 
1977 : 6 व्या लोकसभेत तुरा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजय
1988 : मेघालय राज्याचे मुख्यमंत्री
1996 ते 1998 काळात लोकसभेचे सभापती 
1999 : सोनियांच्या परदेशीपणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून हकालपट्टी- शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना- 
2004 : शरद पवार यूपीएत सामील झाल्यानं राष्ट्रवादीला रामराम
2005 : ममता बॅनर्जी यांच्याशी जुळवून घेत राष्ट्रवादी तृणमूल काँग्रेसची स्थापना
2006 : पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले
 

Web Title: Former Lok Sabha Speaker PA Sangma passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.