Subodh Kumar Jaiswal: राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल सीबीआयचे नवे प्रमुख 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 10:38 PM2021-05-25T22:38:56+5:302021-05-25T22:50:42+5:30

Subodh Kumar Jaiswal CBI Director: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुबोध कुमार जयस्वाल यांची निवड केली आहे. या समितीमध्ये सरन्यायाधीश एन व्ही रमना आणि काँग्रेसचे लोकसभेतील सभागृह नेते अधीर रंजन चौधरी हे आहेत. त्यांनी आज जयस्वाल यांची सीबीआयच्या प्रमुखपदी दोन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. 

Former Maharashtra DGP Subodh Kumar Jaiswal appointed as new CBI Director | Subodh Kumar Jaiswal: राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल सीबीआयचे नवे प्रमुख 

Subodh Kumar Jaiswal: राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल सीबीआयचे नवे प्रमुख 

googlenewsNext

देशातील केंद्रीय तपास संस्था सीबीआयच्या (CBI) संचालकपदी आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आहेत. (Subodh Kumar Jaiswal appointed new CBI Director for two years.)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुबोध कुमार जयस्वाल यांची निवड केली आहे. या समितीमध्ये सरन्यायाधीश एन व्ही रमना आणि काँग्रेसचे लोकसभेतील सभागृह नेते अधीर रंजन चौधरी हे आहेत. त्यांनी आज जयस्वाल यांची सीबीआयच्या प्रमुखपदी दोन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. 



 

जयस्वाल हे महाराष्ट्र केडरचे 1985 बॅचचे अधिकारी आहेत. सध्या ते सीआयएसएफचे संचालक म्हणून नियुक्त होते. मंत्रिमंडळ नियुक्ती समितीनुसार (ACC) जयस्वाल हे लवकरच सीबीआयचा पदभार स्वीकारणार आहेत. ऋषी कुमार शुक्ला यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने फेब्रुवारी महिन्यापासून सीबीआयचे संचालकपद रिक्त होते. अतिरिक्त संचालक प्रवीण सिन्हांकडे याचा पदभार देण्य़ात आला होता. सीबीआयच्या संचालकपदाच्या निवडीसाठी समितीची जवळपास 90 मिनिटे चर्चा सुरु होती. यामध्ये चौधरी यांनी निवड प्रक्रियेवर आक्षेप नोंदविला होता. 

Web Title: Former Maharashtra DGP Subodh Kumar Jaiswal appointed as new CBI Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.