गोव्याचा माजी मंत्री दीड महिना आधीच मुक्त
By admin | Published: October 11, 2015 01:55 AM2015-10-11T01:55:49+5:302015-10-11T01:55:49+5:30
वीज अभियंता कपिल नाटेकर यांना मारहाण केल्याबद्दल शिक्षा भोगत असलेले नुवेचे आमदार व माजी मंत्री मिकी पाशेको यांची शनिवारी तुरुंगातून सुटका झाली. शिक्षेचा सहा
पणजी : वीज अभियंता कपिल नाटेकर यांना मारहाण केल्याबद्दल शिक्षा भोगत असलेले नुवेचे आमदार व माजी मंत्री मिकी पाशेको यांची शनिवारी तुरुंगातून सुटका झाली. शिक्षेचा सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच ४५ दिवस अगोदर त्यांना मुक्त करण्यात आले.
न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर पाशेको गायब झाले होते. सर्वोच्च न्यायालयानेही शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतरदेखील पाशेको पोलिसांच्या हाती लागत नव्हते. २ जुनला ते पोलिसांना शरण आले. त्यानंतर ते सडा तुरुंगात होते.
भाजपा सरकारनेही त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. पाशेको यांचे तुरुंगातील वर्तन पाहून त्यांची सुटका करण्यात आल्याचे तुरुंग महानिरीक्षक एल्वीस गोम्स यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
(खास प्रतिनिधी)