पतीला तरूणीसोबत रंगेहाथ पकडले; तिने घातला राडा, त्यानं दिलं भन्नाट स्पष्टीकरण, Video
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 06:20 PM2024-05-31T18:20:44+5:302024-05-31T18:31:42+5:30
नक्षत्रा आणि तेजा यांचा प्रेमविवाह झाला आहे.
Social Viral : सोशल मीडियाच्या या जगात कोणतीच गोष्ट लपून राहून शकत नाही. नेहमी नवनवीन व्हिडीओ समोर येत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पतीला दुसऱ्या मुलीसोबत पाहताच पत्नीने एकच गोंधळ घातला. नक्षत्रा नावाच्या या महिलेने ३० मे २०२४ रोजी विशाखापट्टणम येथील पतीच्या कार्यालयासमोर न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन केले. खरे तर संबंधित महिला नक्षत्राने तिच्या पतीला एका खोलीत अन्य महिलेसोबत रंगेहाथ पकडले. याच रागातून तिने त्याला मारहाण देखील केली. तिचा पती तेजा याने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले असल्याचा आरोप तिने केला.
२०१३ मध्ये नक्षत्रा आणि तेजा एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रेमात पडले. मग त्यांनी २०१७ मध्ये लग्न केले. दोघांना एक अपत्य आहे. पती तेजा हा मागील काही दिवसांपासून आपला छळ करत असल्याचा आरोप नक्षत्राने केला. दरम्यान, नक्षत्रा ही सामान्य महिला नसून ती माझी मिस वायझॅक आहे. तिने पती तेजावर केलेले सर्व आरोप त्याने फेटाळून लावले. तो म्हणाला की, माझ्याविरुद्ध अनेक खटले दाखल झाले आहेत आणि ते न्यायालयात प्रलंबित आहेत. त्याच्या खोलीतील महिलेबद्दल त्याने सांगितले की, एका चित्रपटासाठी ऑडिशन देण्यासाठी एक तरूणी माझ्याकडे आली होती. बराच वेळ विरोध आणि शिवीगाळ केल्यानंतर नक्षत्राने तिथून जाणे पसंत केले.
Former Miss Vizag catches husband red-handed with another woman.pic.twitter.com/X0bOxlaqnr
— زماں (@Delhiite_) May 31, 2024
नक्षत्रा आणि तेजा यांचा प्रेमविवाह झाला आहे. त्यांना एक मुलगी देखील आहे. माहितीनुसार, नक्षत्रा तिचा संसार सुरळीत चालण्यासाठी प्रयत्न करत असे. अनेकदा तिने पतीच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले. पण, तेजाने विवाहबाह्य संबंध सुरूच ठेवल्याने नक्षत्राच्या संयमाचा बांध फुटला. त्याच्या या कृत्यामुळे निराश होऊन, संतापलेल्या नक्षत्राने सर्वांसमोर तेजाचा खरा चेहरा समोर आणला. ती जेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये गेली तेव्हा तिच्यासोबत माध्यमांचे प्रतिनिधी देखील होते. मात्र, संबंधित महिला केवळ चित्रपटाच्या प्रकल्पासाठी माझ्यासोबत होती, असे स्पष्टीकरण देत तेजाने सर्व आरोप फेटाळले. मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ पासून या जोडप्याच्या घटस्फोटाची प्रक्रिया कौटुंबिक न्यायालयात सुरू होती.