पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतींच्या भारतातील जमिनीचा लिलाव; इतक्या कोटींना विकली गेली जमीन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 01:44 PM2024-09-06T13:44:35+5:302024-09-06T13:56:03+5:30
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा भाऊ आणि कुटुंबीयांच्या जमिनीचा उत्तर प्रदेशातील बागपत येथे लिलाव करण्यात आला
Pervez Musharraf Property In India: पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ आणि त्यांच्या कुटुंबियांचा भारतातून मागमूसही पुसला गेला. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा भाऊ आणि कुटुंबीयांच्या जमिनीचा उत्तर प्रदेशातील बागपत येथील लिलाव करण्यात आला. या १३ बिघा जमिनीचा लिलाव १ कोटी ३८ लाख १६ हजार रुपयांना झाला आहे. त्याची मूळ किंमत ३९ लाख १६ हजार रुपये ठेवण्यात आली होती.
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा भाऊ आणि कुटुंबीयांच्या जमिनीचा उत्तर प्रदेशातील बागपत येथे लिलाव करण्यात आला. या १३ बिघा जमिनीचा लिलाव १ कोटी ३८ लाख १६ हजार रुपयांना झाला आहे. बागपतच्या कोटाणा गावात असलेली ही जमीन शत्रूची मालमत्ता होती. लिलावाचे पैसे केंद्रीय मंत्रालयाच्या कस्टोडियन ऑफ एनीमी प्रॉपर्टी डिपार्टमेंटच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. परवेज मुशर्रफ यांचे वडील आणि आई दिल्लीला जाण्यापूर्वी येथे राहत होते. उत्तर प्रदेशातील परवेझ मुशर्रफ यांच्या कुटुंबाची भारतातील ही शेवटची जमीन होती.
लिलावादरम्यान, तीन लोकांनी या मालमत्तेची किंमत १.३८ कोटी रुपये ठेवली आहे. खसरा क्रमांक आठच्या जमिनीची ई-लिलाव प्रक्रिया सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होती. ही मालमत्ता १० तासांत खरेदी करण्यात आली. शत्रूच्या मालमत्तेची विक्री केल्याने बागपतमध्ये परवेझ मुशर्रफ आणि त्यांच्या कुटुंबातील नूरूचे नाव कायमचे मिटलं गेले आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, लखनऊमधून ई-लिलाव प्रक्रियेची माहिती बागपत प्रशासनाला देण्यात आली आहे. बागपत येथील पंकज कुमार यांनीही १३ बिघांपैकी सुमारे साडेपाच बिघे जमीन खरेदी केली आहे. शत्रू मालमत्तेचा लिलाव ५ सप्टेंबर रोजी ऑनलाइन झाला. कोटाना गाव हे देखील महत्त्वाचे आहे कारण ते केवळ पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतींचे नाही तर त्यांच्या आजोबांचे निवासस्थान देखील होते.
परवेझ मुशर्रफ यांचे वडील मुशर्रफुद्दीन आणि आई बेगम जरीन हे कोटाना गावचे रहिवासी होते. दोघांचा विवाहसुद्धा कोटाणा येथे झाला होता. परवेझ मुशर्रफ आणि त्यांचे बंधू डॉ. जावेद मुशर्रफ यांचा जन्म १९४३ साली दिल्लीत झाला. १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब पाकिस्तानात स्थायिक झाले होते. पण दिल्ली व्यतिरिक्त कोटाणा येथे त्यांच्या कुटुंबाची वाडा आणि शेतजमीन आहे. त्यांच्या भावाच्या जमिनीचा लिलाव झाला आहे.