CoronaVirus : मनमोहन सिंगांनंतर देवेगौडांचं पंतप्रधान मोदींना पत्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिले महत्वाचे सल्ले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 04:02 PM2021-04-26T16:02:42+5:302021-04-26T16:05:03+5:30
देशातील गरीब समुहांना डोळ्यासमोर ठेऊनच लशीची किंमत निश्चित करायला हवी. देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देणे हा मानवतेच्या दृष्टीने चांगला संकेत असेल.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. यातच कोरोनाचा सामना करण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यानंतर, आता माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून काही सल्ले दिले आहेत. यात, केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस दिली, तर मानवतेच्या दृष्टीने हा एक चांगला संकेत असेल, असे एचडी देवेगौडा यांनी लिहिले आहे. (Former pm hd deve gowda writes to pm modi and give suggestions On the background of corona virus)
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडांनी नेमके काय म्हटले आहे पत्रात -
- आरोग्य प्रशासन आणि कोविड व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करायला हवे. जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी वैद्यकीय व्यावसायिकांना छोट्या करारावर नोकरी देण्याची आवश्यकता आहे.
- सर्व जिल्हा मुख्यालयांत वॉर रूम बनविण्याची आवश्यकता. खासगी आणि सरकारी क्षेत्रांत कोरोना सेंटर आणि आरोग्य केंद्रे वाढविण्याची गरज.
- सध्या ग्रामीण भाग, तालुके आणि गावांत कोविड व्यवस्थापनाची तयारी करण्याची गरज लशीसंदर्भातील भ्रम दूर करण्याची आवश्यकता.
- निवडून आलेल्या लोकप्रतिनिधिंनी, आपल्या मतदारसंघात पुरेशा लशी आहेत, की नाही याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
- देशातील गरीब समुहांना डोळ्यासमोर ठेऊनच लशीची किंमत निश्चित करायला हवी. देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देणे हा मानवतेच्या दृष्टीने चांगला संकेत असेल.
CoronaVirus : निवडणूक काळातच कोलकात्यात कोरोना स्फोट; प्रत्येक दुसरा व्यक्ती आढळतोय कोरोना पॉझिटिव्ह
- लस घेण्यासाठी आलेल्या गरीब लोकांना आयडी कार्ड सारख्या समस्येतून मुक्त करायला हवे. इंटरनेट नसणे आणि सरकारी वेबसाइटची माहिती नसणे याचा त्यांच्या लसीकरणावर परिणाम होऊ नये.
- 12-15 वर्षांच्या मुलांसाठीही व्हॅक्सीनेशन ट्रायल व्हायला हवे.
- खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनाही आरोग्य विमा द्यायला हवा. छोटे नर्सिंग होम आणि ग्रामिण भागांत क्लिनिकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याची आवश्यकता आहे.
Former PM HD Deve Gowda writes to PM Narendra Modi, offering suggestions in order to contain the spread of #COVID19.
— ANI (@ANI) April 26, 2021
"If the government decides to give vaccines free to all citizens, that would be a great humanitarian gesture," he writes. pic.twitter.com/xKdW3F6xix
- सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या गर्भवती महिलांना तीन महिन्यांची सुट्टी द्यायला हवी. तसेच वेतनही द्यायला हवे.
- ज्या कोरोना योध्याचा या लढाईत मृत्यू झाला, त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नौकरी द्यायला हवी.
- पुढील सहा महिन्यांसाठी मोठ्या सामूहिक हालचालिंवर बंदी घालण्याची आवश्यकता. पुढील सहा महिन्यांसाठी राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुका थांबवायला हव्यात.