माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, एम्स रुग्णालयात केले दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 10:40 PM2020-05-10T22:40:13+5:302020-05-10T23:08:24+5:30

रविवारी प्रकृतीबाबत काही समस्या जाणवल्यानंतर मनमोहन सिंग यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Former Prime Minister Dr. Manmohan Singh admitted to AIIMS hospital In Delhi BKP | माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, एम्स रुग्णालयात केले दाखल

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, एम्स रुग्णालयात केले दाखल

Next

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी प्रकृतीबाबत काही समस्या जाणवल्यानंतर मनमोहन सिंग यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनमोहन सिंग यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. 

छातीच दुखत असल्याची तक्कार केल्यानंतर नऊच्या सुमारास डॉ. सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉ. नितीश  नाईक यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. सिंग यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलेले आहे. मात्र त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलेले नाही. मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ या काळात देशाचे पंतप्रधानपद भूषवले होते. 

Web Title: Former Prime Minister Dr. Manmohan Singh admitted to AIIMS hospital In Delhi BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.