भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना एम्समधून डिस्चार्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 01:59 PM2020-05-12T13:59:40+5:302020-05-12T14:07:41+5:30

गेल्या रविवारी नवीन औषधांची रिअॅक्शन झाल्यामुळे डॉ. मनमोहन सिंग यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

Former Prime Minister Dr Manmohan Singh has been discharged from AIIMS rkp | भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना एम्समधून डिस्चार्ज 

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना एम्समधून डिस्चार्ज 

Next
ठळक मुद्देडॉ. मनमोहन सिंह हे सध्या राजस्थानमधून राज्यसभा सदस्य निवडून आले आहेत. २००४ ते २०१४ या दहा वर्षांसाठी त्यांनी देशाचे पंतप्रधानपद सांभाळले होते.

नवी दिल्ली : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये उपचारांसाठी दाखल झालेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी त्यांची वैद्यकीय तपासणी झाली. त्यानंतर एम्सच्या डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्याचा निर्णय घेतला. 

गेल्या रविवारी नवीन औषधांची रिअॅक्शन झाल्यामुळे डॉ. मनमोहन सिंग यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. ताप आल्यामुळे त्यांची अधिक काळजी घेण्यात आली. तसेच, एम्सच्या डॉक्टरांची एक टीम त्यांची देखरेख करत होती. मंगळवारी डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 


दरम्यान, डॉ. मनमोहन सिंग हे सध्या राजस्थानमधून राज्यसभा सदस्य निवडून आले आहेत. २००४ ते २०१४ या दहा वर्षांसाठी त्यांनी देशाचे पंतप्रधानपद सांभाळले होते. २००९ साली एम्स डॉक्टरांनी त्यांची एक बायपास सर्जरी केली होती. त्याआधी दिल्लीत २००३ मध्ये अॅजिओप्लास्टी करण्यात आली होती. 
 

Web Title: Former Prime Minister Dr Manmohan Singh has been discharged from AIIMS rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.