नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 01:33 PM2024-05-19T13:33:20+5:302024-05-19T13:34:27+5:30
पत्रकारांना संबोधित करताना माजी पंतप्रधान म्हणाले, ‘रेवण्णाबाबत न्यायालयात सुरू असलेल्या गोष्टींवर मला भाष्य करायचे नाही. प्रज्वल याचसंदर्भात परदेशात गेला आहे. कुमारस्वामी (देवेगौडा यांचे कनिष्ठ चिरंजीव आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष) यांनी आमच्या कुटुंबाच्या वतीने म्हटले आहे की, देशाच्या कायद्यानुसार वागणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
- बंगळुरू (कर्नाटक) : कथित सेक्स स्कँडलमध्ये अडकलेला आपला नातू व पक्षाचा खासदार प्रज्वल रेवण्णा याच्यावरील आरोपांवर पहिल्यांदाच आपले मौन तोडत जेडीएस पक्षाचे सर्वेसर्वा व देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी शनिवारी सांगितले की, दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यास हरकत नाही.
पत्रकारांना संबोधित करताना माजी पंतप्रधान म्हणाले, ‘रेवण्णाबाबत न्यायालयात सुरू असलेल्या गोष्टींवर मला भाष्य करायचे नाही. प्रज्वल याचसंदर्भात परदेशात गेला आहे. कुमारस्वामी (देवेगौडा यांचे कनिष्ठ चिरंजीव आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष) यांनी आमच्या कुटुंबाच्या वतीने म्हटले आहे की, देशाच्या कायद्यानुसार वागणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
या प्रकरणात अनेक लोक गुंतलेले आहेत, मला कोणाचेही नाव घ्यायचे नाही. कुमारस्वामी यांनी संबंधित सर्वांवर कारवाई करावी आणि पीडित महिलांना न्याय आणि नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. प्रज्वलवर कारवाईला आमचा आक्षेप नाही; पण रेवण्णा यांच्यावर केलेले आरोप आणि खटला कसा बनला हे लोकांना कळले आहे, असे ते म्हणाले.