Donald Trump's Visit : ट्रम्प यांच्या आयोजित डिनरला जाणार नाही मनमोहन सिंग अन् गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 09:24 PM2020-02-24T21:24:39+5:302020-02-24T21:31:58+5:30

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या डिनरमध्ये सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु त्यांनी आता या डिनरमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.

former prime minister manmohan singh and leader opposition ghulam nabi azad will not attend the dinner for trump | Donald Trump's Visit : ट्रम्प यांच्या आयोजित डिनरला जाणार नाही मनमोहन सिंग अन् गुलाम नबी आझाद

Donald Trump's Visit : ट्रम्प यांच्या आयोजित डिनरला जाणार नाही मनमोहन सिंग अन् गुलाम नबी आझाद

Next
ठळक मुद्देकोविंद यांनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये काँग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अन् विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद त्यात सहभागी होणार नाहीत.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या डिनरमध्ये सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. काँग्रेसच्या अध्यक्षा आणि UPAच्या प्रमुख सोनिया गांधींना या डिनरचं आमंत्रण देण्यात आलेलं नाही.

नवी दिल्लीः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी डिनरचं आयोजन केलं आहे. परंतु राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये काँग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अन् विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद त्यात सहभागी होणार नाहीत.
 
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या डिनरमध्ये सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु त्यांनी आता या डिनरमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा आणि UPAच्या प्रमुख सोनिया गांधींना या डिनरचं आमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अन् विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद नाराज आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधीर रंजन यांनीसुद्धा यावर आक्षेप नोंदवला आहे. विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना आमंत्रण देण्याची एक परंपरा आहे, परंतु त्यापासून फारकत घेतली जात आहे.

 

गुलाम नबी आझाद यांचासुद्धा नकार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीसुद्धा डिनरमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. त्यांना राष्ट्रपती भवनाकडून निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु त्यांनी डिनरमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधींना निमंत्रण दिलेलं नसल्यानं अशा कार्यक्रमात आम्ही सहभागी होणं योग्य नाही. राज्यसभेतील विरोधी पक्षांचे उपनेते आनंद शर्मांनी मोटेरा स्टेडियममध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांना न बोलवण्यावरही टीका केली आहे. 

Web Title: former prime minister manmohan singh and leader opposition ghulam nabi azad will not attend the dinner for trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.