पंजाबचे माजी मुख्यमंत्री सूरजितसिंग बर्नाला कालवश
By admin | Published: January 15, 2017 04:47 AM2017-01-15T04:47:56+5:302017-01-15T04:47:56+5:30
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सूरजितसिंग बर्नाला यांचे शनिवारी येथे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. पंजाबात हिंसाचाराने टोक गाठलेले असताना, त्यांची राज्याची धुरा सांभाळली
Next
चंडीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री सूरजितसिंग बर्नाला यांचे शनिवारी येथे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. पंजाबात हिंसाचाराने टोक गाठलेले असताना, त्यांची राज्याची धुरा सांभाळली होती. अकाली दलाचे मध्यममार्गी नेते असलेल्या बर्नाला यांनी १९८५ ते १९८७ या काळात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली. त्यांनी तामिळनाडू, उत्तराखंड, आंध्र प्रदेश व अंदमान-निकोबारचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले. मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात बर्नाला कृषिमंत्री तर वाजपेयींच्या मंत्रिमंडळात ते रसायने व खते मंत्री होते.