Amrinder Singh Resigns : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा, नव्या पक्षाचीही घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 05:21 PM2021-11-02T17:21:03+5:302021-11-02T17:21:37+5:30
Amrinder Singh Resigns : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला राजीनामा. नव्या पक्षाचीही केली घोषणा.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री (Former CM Punjab) कॅप्टन अमरिंदर सिंग (Amrinder Singh) यांनी अखेर काँग्रेस पक्षाचा हात सोडला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून यासंदर्भातील पत्र काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे पाठवलं आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण काँग्रेसचाही राजीनामा देणार असल्याचं त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं.
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाचाही राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. यासोबतच त्यांनी आपल्या नव्या पक्षाचीही घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या नव्या पक्षाला पंजाब लोक काँग्रेस असं नाव दिलं आहे. आपण पंजाबमधील सर्व ११७ जागा लढवू असंही त्यांनी सांगितलं होतं. याशिवाय भाजपसोबत युती केली जाईल का नाही यावरही त्यांनी भाष्य केलं होतं. "मी भाजपसोबत युती करण्याबाबत कधीही वक्तव्य केलं नव्हतं. आम्ही सीट शेअर करू शकतो. याबाबत भाजपशी चर्चा झाली नसली तरी यावर विचार करत आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
Former Punjab CM Captain Amarinder Singh resigns from Congress party in a letter to Sonia Gandhi pic.twitter.com/CndmJTeEJq
— ANI (@ANI) November 2, 2021
I have today sent my resignation to @INCIndia President Ms Sonia Gandhi ji, listing my reasons for the resignation.
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) November 2, 2021
‘Punjab Lok Congress’ is the name of the new party. The registration is pending approval with the @ECISVEEP. The party symbol will be approved later. pic.twitter.com/Ha7f5HKouq
काँग्रेसवरही साधला होता निशाणा
अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्यानंतर पक्षामध्ये माझा अपमान होत असल्याचं सांगितलं होतं. अमरिंदर यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबमधील राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या होत्या. "काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये १५ जागा मिळणंही मुश्कील "असल्याचं म्हणत त्यांनी सणसणीत टोला लगावला होता. परनीत कौर यांनी "अशीच परिस्थिती राहिल्यास आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ११७ पैकी १५ जागाही पक्षाला जिंकता येणार नाहीत," असंही म्हटलं होतं.