पंजाबचे माजी पोलीस महासंचालक केपीएस गिल यांचे निधन
By admin | Published: May 26, 2017 05:46 PM2017-05-26T17:46:01+5:302017-05-26T17:46:01+5:30
पंजाबचे माजी पोलीस महासंचालक केपीएस गिल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 05 - पंजाबचे माजी पोलीस महासंचालक केपीएस गिल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.
दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात केपीएस गिल यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची किडणी निकामी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचे निधन झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.
केपीएस गिल यांचे पूर्ण नाव कंवर पाल सिंह गिल असे होते. त्यांनी दोन वेळा पंजाबच्या पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी सांभाळली होती. 1995 साली त्यांनी पोलीस दलातून निवृत्ती स्वीकारली होती. तसेच, केपीएस गिल भारतीय हॉकी संघाचे माजी अध्यक्ष सुद्धा होते.
80 च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवाद उफाळून आला होता. त्यावेळी केपीएस गिल यांनी पोलीस महासंचालकपदावर असताना संपूर्ण खलिस्तानी दहशतवाद्यांचा नायनाट केला होता. यामुळे त्यांना सुपरकॉप म्हणून ओळखले जात होते. याचबरोबर, केपीएस गिल यांना प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
Former Punjab DGP KPS Gill passed away at Sir Ganga Ram Hospital in Delhi,after sudden cardiac arrest due to cardiac arrhythmia pic.twitter.com/ue7KYfbDQZ
— ANI (@ANI_news) May 26, 2017
Doctors say KPS Gill was suffering from End Stage Kidney Failure and significant Ischemic Heart Disease,had been recovering from Peritonitis
— ANI (@ANI_news) May 26, 2017