CoronaVirus: कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव, गाफीलपणा भोवला; रघुराम राजन केंद्रावर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 04:42 PM2021-05-04T16:42:20+5:302021-05-04T16:47:03+5:30
CoronaVirus: माजी गव्हर्नरांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त करत कठोर शब्दांत टीका केली आहे.
नवी दिल्ली: देशभरात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स, कोरोना लसीची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर माजी गव्हर्नरांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त करत कठोर शब्दांत टीका केली आहे. कोरोनाबाबतीत दूरदृष्टीचा अभाव आणि गाफीलपणा केंद्र सरकारला नडला, असा घणाघात करण्यात आला आहे. (former rbi governor raghuram rajan criticized central govt over corona situation in country)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत सरकार आधीपासूनच सतर्क राहिले असते, तर त्यांनी तसे नियोजन केले असते. मात्र, दुसऱ्या लाटेबाबत गाफील राहिल्यामुळेच कोरोनाचा देशात कहर झाला आहे. सरकारमधील कमकुवत नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव यामुळे कोरोच्या दुसऱ्या लाटेने देशात मोठे नुकसान केले, अशी कठोर टीका रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली आहे.
तुम्ही डोळेझाक करू शकता, आम्ही नाही; दिल्ली हायकोर्टाचे केंद्रावर ताशेरे
भारतात इतकी वाईट परिस्थिती ओढवली नसती
सरकारमधील कोणी जगाकडे लक्ष दिले असते, इतरत्र कोरोनाची काय परिस्थिती आहे, हे पाहिले असते, तर कदाचित भारतात वाईट स्थिती ओढवली नसती, असेही राजन यांनी म्हटले आहे. ब्राझीलमधल्या परिस्थितीतून बोध घेऊन सरकारने आणखी तयारीनिशी सज्ज रहाणे आवश्यक होते, असा सल्ला राजन यांनी दिला आहे.
“गैरमार्गाने केलेल्या कामाचा हेतू कधी शुद्ध राहत नाही”; न्यायालयाने सुजय विखेंना सुनावले
सरकारी यंत्रणा आत्मसंतुष्ट बनली
पहिल्या लाटेवर नियंत्रण मिळवल्यावर सरकारी यंत्रणा आत्मसंतुष्ट बनली आणि तिथेच घात झाला.गेल्या वर्षी पाहिल्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या एका लाखांवर गेली नव्हती. मात्र यावेळी त्यात तीनपटीने वाढ झाली आहे. तसेच देशात लसीकरण मोहिमेतील गोंधळ कोरोनाची साथ वाढण्यास कारणीभूत असल्याचा आरोप राजन यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालेल, ‘तोपर्यंत’ धोका नाही; राष्ट्रवादी नेत्याचा दावा
कोरोनाची दुसरी लाट आणखी घातक
कोरोनाची दुसरी लाट आणखी घातक बनली असून, केंद्रातील अनेक बड्या अधिकाऱ्यांनी भारताने कोरोनाविरोधातील लढाई जिंकली, भारताने कोरोनाला पराभूत केले, अशा प्रकारच्या घोषणा यापूर्वीच केल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात मार्च आणि एप्रिल महिन्यात करोनाने पुन्हा शिरकाव केला, असेही राजन यांनी सांगितले.
संकटात दिलासा! RIL च्या नफ्यात वाढ; २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना देणार बोनस
दरम्यान, महाराष्ट्रासह दिल्ली, छत्तीसगढ, पंजाब, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दमण आणि दिव, लक्षद्वीप आणि लडाख या ठिकाणी गेल्या १५ दिवसांमध्ये रुग्णसंख्या घटतांना दिसत आहे. महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्येही केरोना रुग्णांचा आलेख सपाट होत असून या राज्यांमध्ये लवकरच नव्या रुग्णांचा आलेख घटतांना दिसू शकेल, अशी आशा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.