महापुरुषांचे पुतळे उभारण्याऐवजी शाळा, महाविद्यालये उभी करा, रघुराम राजन यांची मोदी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 10:33 AM2019-12-09T10:33:33+5:302019-12-09T10:47:04+5:30

सरकारी यंत्रणांच्या दुरुपयोग होत असल्यावरून सुद्धा रघुराम राजन यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे.

former rbi governor raghuram rajan on economic growth statue school university narendra modi govt | महापुरुषांचे पुतळे उभारण्याऐवजी शाळा, महाविद्यालये उभी करा, रघुराम राजन यांची मोदी सरकारवर टीका

महापुरुषांचे पुतळे उभारण्याऐवजी शाळा, महाविद्यालये उभी करा, रघुराम राजन यांची मोदी सरकारवर टीका

Next

नवी दिल्ली : भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. भारतात राष्ट्रीय आणि धार्मिक महापुरुषांचे पुतळे उभारण्याऐवजी जास्तीत जास्त आधुनिक शाळा, महाविद्यालये उभारणे गरजेचे असल्याचे रघुराम राजन म्हणाले. ‘इंडिया टुडे’ नियतकालिकातील 'How to fix the economy' लेखात रघुराम राजन यांनी  भारतीय अर्थव्यवस्थेवर सविस्तर भाष्य केले आहे. यामध्ये त्यांनी हिंदू राष्ट्रवाद फक्त सामाजिक तणाव वाढवत नाही, तर भारताच्या आर्थिक विकासाचा रस्ता सुद्धा बदलतो, असे रघुराम राजन यांनी म्हटले आहे. 

पुतळे नव्हे तर शाळा, महाविद्यालये उभारावीत
नरेंद्र मोदी सरकारच्या सामाजिक-राजकीय अजेंठ्यावर टीका करताना रघुराम राजन यांनी सांगितले की, " राष्ट्रीय किंवा धार्मिक महापुरुषांचे मोठे मोठे पुतळे उभारण्याऐवजी भारताला जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालये उभारणे गरजेचे आहे. ज्यामुळे येथील मुलांचा मानसिक विकास होईल. ते जास्त सहिष्णु आणि एकमेकांशी सन्मानाने वागायला शिकतील. यामुळे ही मुलं भविष्यातील स्पर्धात्मक जगात आपली जागा निर्माण करण्यात यशस्वी होतील."

तणाव निर्माण करतोय हिंदू राष्ट्रवाद
सत्तेत जे असतात, त्यांची एक प्रवृत्ती असते की जास्तीत जास्त नियंत्रण पाहिजे असते. सध्याचे सरकार सुद्धा अपवाद नाही आहे. खासकरुन, जोपर्यंत या सरकारचा सोशल आणि पॉलिटिकल अजेंडा दिसून आहे, असे सांगत रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हिंदू राष्ट्रवाद फक्त सामाजिक तणाव निर्माण करत नाही, तर कोणत्याही प्रकारे भारताच्या हिताचा नाही. परंतु भारताच्या आर्थिक विकासावर याचा परिणाम होतो. ज्यामुळे सामजिक तणाव आणखीनच वाढतो, असेही रघुराम राजन यांनी म्हटले आहे. 

सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग
सरकारी यंत्रणांच्या दुरुपयोग होत असल्यावरून सुद्धा रघुराम राजन यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. सरकार आपल्याच अधिकारांना कमकुवत करत आहे. कारण, त्यांना भविष्यातील सरकारद्वारे अशाच कारवाईची भीती वाटेल, असे राघुराम राजन यांनी म्हटले आहे. प्रोफेशनलिज्म म्हणजे चौकशी करणारी आणि टॅक्स यंत्रणांना कोणच्याही पाठिमागे पडण्याची परवानगी दिली नाही पाहिजे. याशिवाय, चौकशी यंत्रणांना सावधानता बाळगली पाहिजे की सर्व बिझनेसलाच कोठेतरी खोटे किंवा गुन्हेगार घोषित करु नये. तसेच, याचा राजकीय बदल्याच्या भावनेतून वापर केला जात आहे, असा संदेश जाऊ नये असेही रघुराम राजन यांनी म्हटले आहे. 
 

Read in English

Web Title: former rbi governor raghuram rajan on economic growth statue school university narendra modi govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.