Sputnik V : गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयात सामान्यांसाठी 'स्पुटनिक व्ही'च्या ट्रायल रनला सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 23:11 IST2021-06-27T23:08:43+5:302021-06-27T23:11:20+5:30
Coronavirus Vaccine Sputnik V : गुरुग्रामच्या फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सामान्य जनतेसाठी कोरोना लसीचं ट्रायल रन सुरू करण्यात आलं आहे.

Sputnik V : गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयात सामान्यांसाठी 'स्पुटनिक व्ही'च्या ट्रायल रनला सुरूवात
कोरोना विषाणूविरोधातील लढाईत (Coronavirus) रशियाच्या स्पुटनिक व्ही (Sputnik V) या लसीचं ट्रायल रुन सुरू करण्यात आलं आहे. गुरुग्रामच्या फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सामान्य जनतेसाठी कोरोना लसीचं ट्रायल रन सुरू करण्यात आलं. तर दिल्ली एनसीआरच्या निरनिराळ्या भागांमध्ये लसी पोहोचण्यास वेळ लागत आहे. स्पुटनिक व्ही लसीचं भारतात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीतर्फे उत्पादन आणि वितरण करण्यात येणार आहे.
देशात २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. ७५ लसी केंद्र सरकारला तर २५ टक्के लसी या खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे. तसंच देशात खासगी रुग्णालयांसाठी केंद्र सरकारनं लसींचे दरही निश्चित केले आहे. केंद्र सरकारनं स्पुटनिक व्हीच्या एका डोसची किंमत १,१४५ रूपये निश्चित केली आहे.
Fortis Memorial Research Institute, Gurugram starts SputnikV trial run for the general public. pic.twitter.com/wea4KTIcLn
— ANI (@ANI) June 27, 2021
दरम्यान, दिल्ली एनसीआरच्या निरनिराळ्या खासगी रुग्णालयांना आतापर्यंत स्पुटनिक व्हीच्या लसी देण्याचं काम सुरू करण्यात आलेलं नाही. स्पुटनिक व्ही अद्याप लाँच करणं बाकी आहे. त्यामुळे मॅनेजमेंट त्यावर काम करत असल्याची प्रतिक्रियी इंद्रप्रस्त अपोलो रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्यानं रविवारी आयएएनएसशी बोलताना सांगितलं. स्पुटनिक व्ही या लसीचे दोन निरनिराळे डोस आहेत. यामध्ये २१ दिवसांचं अंतर ठेवणं आवश्यक आहे.