जगन्नाथ मंदिरातील तिजोरीच्या हरवल्या किल्ल्या; सरकारवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 02:01 AM2018-06-05T02:01:43+5:302018-06-05T02:01:43+5:30
बाराव्या शतकातील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या तिजोरीच्या किल्ल्या हरवल्या आहेत. मंदिर व्यवस्थापन समितीच्या ४ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत रत्नभांडारच्या आतील खोल्यांच्या किल्ल्या हरवल्या असल्याची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे सदस्य रामचंद्र दास महापात्र यांनी दिली.
भुवनेश्वर : बाराव्या शतकातील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या तिजोरीच्या किल्ल्या हरवल्या आहेत. मंदिर व्यवस्थापन समितीच्या ४ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत रत्नभांडारच्या आतील खोल्यांच्या किल्ल्या हरवल्या असल्याची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे सदस्य रामचंद्र दास महापात्र यांनी दिली.
पुरीचे शंकराचार्य आणि विरोधी पक्ष भाजपाने किल्ल्या हरवल्याचा निषेध केला आहे. समितीच्या १६ सदस्यांनी ४ एप्रिलला उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कडक सुरक्षेत ३४ वर्षानंतर रत्न भांडारमध्ये प्रवेश केला होता. या सदस्यांना आतील खोलीत जाण्याची गरज नव्हती, लोखंडी जाळीतून आतील भाग पाहता येतो, असे मंदिर प्रशासन अधिकाऱ्याने तपासणीनंतर सांगितले.
रत्न भांडारच्या सात खोल्यांपैकी दोन खोल्या बाहेर आहेत. यांचा वापर वेळोवेळी केला जातो. आतील खोल्यांच्या किल्ल्या ना मंदिर प्रशासनाकडे आहेत ना पुरी जिल्हा कोषागाराकडे, असे महापात्र यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
मुख्यमंत्र्याचे चौकशीचे आदेश
किल्ल्या नसण्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आला. शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी किल्ल्या हरवल्याबद्दल ओडिशा सरकारवर टीका केली आहे, तर भाजपाने मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणी केली आहे. मंदिराचे प्रशासन व राज्य सरकार जबाबदाºया पार पाडण्यात अपयशी ठरले आहे, असे शंकराचार्य म्हणाले. मुख्यमंत्री पटनाईक यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.