नशीबवान...सलग २३ वेळा ह्रदय बंद पडूनही बचावला हा इसम

By Admin | Published: January 29, 2016 05:08 PM2016-01-29T17:08:42+5:302016-01-29T17:30:26+5:30

तब्बल २३ ह्रदयविकारानं ह्रदय बंद पडूनही, ते ही अवघ्या ४ तासात, एक व्यक्ती केवळ नशीबानं आश्चर्यकारकरीत्या बचावल्याची घटना घडली आहे

Fortunate ... 23 consecutive times the heart was closed | नशीबवान...सलग २३ वेळा ह्रदय बंद पडूनही बचावला हा इसम

नशीबवान...सलग २३ वेळा ह्रदय बंद पडूनही बचावला हा इसम

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
कोची, दि. २९ - तब्बल २३ ह्रदयविकारानं ह्रदय बंद पडूनही, ते ही अवघ्या ४ तासात,  एक व्यक्ती केवळ नशीबानं आश्चर्यकारकरीत्या बचावल्याची घटना घडली आहे. आपल्या नातवासोबत ६० वर्षे वयाची ही व्यक्ती क्रिकेट खेळत होती. सिगारोटचं जबर व्यसन असलेल्या या गृहस्थाला जोरात छातीत दुखायला लागलं. त्याला लगेचच, जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
कार्डिओग्राम काढला असता हार्ट अॅटॅक आल्याचं निश्चित झालं. डॉक्टरांचे उपचार अपयशी होत होते कारण अनेकवेळा ह्रदयाची धडधडच थांबायची, ज्याला कार्डिअॅक अॅरेस्ट म्हणतात. शेवटी त्यांना बड्या रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु तिथेही शस्त्रक्रिया होऊ शकली नाही, कारण ह्रदयविकाराचे धक्के बसतच होते.
शेवटी असं लक्षात आलं, की या गृहस्थाचं ४ तासांच्या अवधीत २३ वेळा ह्रदय बंद पडलं होतं, उपचार करण्यासाठी असलेला मौल्यवान वेळ फुकट गेला होता, ह्रदय वारंवार बंद पडत होतं, जे सुरू करण्यासाठी डॉक्टरांना प्रयत्न करावे लागत होते. आणि एवढं सगळं होऊनही हा गृहस्थ चक्क जिवंत राहिला. अखेर डॉक्टरांनी चार तासांनंतर ऑपरेशन केलं आणि स्टेंट टाकले.
या गृहस्थानं आपला पुनर्जन्म झाल्याचं म्हटलं असून आता सिगारेट सोडणार आणि नित्यनेमानं व्यायाम करणार असल्याचं म्हटलं आहे.

Web Title: Fortunate ... 23 consecutive times the heart was closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.