आशियातील सर्वांत मोठ्या विमानतळाची पायाभरणी; PM मोदी, योगी, ज्योतिरादित्य शिंदेंची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 11:34 AM2021-11-26T11:34:34+5:302021-11-26T11:36:26+5:30
मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी म्हणाले की, मी त्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानतो ज्यांनी विमानतळासाठी आपली जमीन दिली. मुख्यमंत्र्यांनी ग्रेटर नोएडासाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा उल्लेख केला. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचेही भाषण झाले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. २५) जेवरमध्ये नॉयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली. ६२०० हेक्टर क्षेत्रासह, हे आशियातील सर्वात मोठे विमानतळ असेल. विशेष म्हणजे ते प्रदूषणमुक्त असेल आणि यूपीचे पाचवे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल.
विमानतळाच्या पायाभरणीनंतर पंतप्रधानांनी प्रदर्शनाला भेट दिली. तसेच विमानतळाच्या विकासाच्या प्रवासावर आधारित चित्रपट दाखवण्यात आला. मोदी म्हणाले, आम्ही प्रथम राष्ट्राच्या भावनेवर चालतो. उत्तर प्रदेशात एकाच वेळी नऊ वैद्यकीय महाविद्यालये सुरू करून नव्या अध्यायाला प्रारंभ केला आहे. महोबा आणि झाशी येथेही अनेक कामे झाली.
मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी म्हणाले की, मी त्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानतो ज्यांनी विमानतळासाठी आपली जमीन दिली. मुख्यमंत्र्यांनी ग्रेटर नोएडासाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा उल्लेख केला. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचेही भाषण झाले.
शेतकऱ्यांना बेघर करू नका -
- जेवरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे, त्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
- जेवरमधील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई का दिली जात नाही, असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला. या कडाक्याच्या थंडीत शेतकरी कुटुंबांना तंबूत राहण्याशिवाय पर्याय नाही, असे त्या म्हणाल्या.