कुपवाडा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना चार जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 06:13 PM2018-03-21T18:13:39+5:302018-03-21T18:13:39+5:30
याठिकाणी अजूनही चकमक सुरूच आहे.
जम्मू-काश्मीर: कुपवाडा सेक्टरमध्ये बुधवारी दहशतवाद्यांशी लढताना भारताचे चार जवान शहीद झाले. येथील हलमतपोरा येथे मंगळवारी संध्याकाळपासून दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू होती. भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवादी लपून बसलेल्या परिसराला घेराव घातला होता. त्यानंतर सुरू झालेली चकमक अजूनही सुरूच आहे. दहशतवाद्यांशी लढताना आज सकाळी जम्मू-काश्मीर पोलीस दलातील दोन जवानांना वीरमरण आले. तत्पूर्वी भारतीय सैन्याने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.
मात्र, अजूनही याठिकाणी काही दहशतवादी लपून बसले आहेत. त्यांच्यात आणि भारतीय सैन्यात अजूनही चकमक सुरू आहे. आतापर्यंत या चकमकीत दुर्देवाने जम्मू-काश्मीर पोलीस दलाच्या दोन आणि सुरक्षा दलाच्या एका जवानाला वीरमरण आल्याची माहिती पोलीस महासंचालक शेष पॉल वेद यांनी दिली.
"4th dead body of terrorist recovered from encounter site of Kupwara, firing still continues, unfortunately 2 brave hearts of J&K Police martyred & one of TA", tweets Shesh Paul Vaid, #JammuAndKashmir DGP (File pic) pic.twitter.com/ZRjUEI3FpQ
— ANI (@ANI) March 21, 2018
#WATCH Encounter underway between security forces & terrorists in Kupwara's Halmatpora. Two policemen lost their lives in fresh exchange of fire today. Four terrorists were killed during the encounter last night. (visuals deferred by unspecified time) #JammuAndKashmirpic.twitter.com/lqCWIQkXbR
— ANI (@ANI) March 21, 2018