अजिंठा चौफुली दगडफेक प्रकरणी चौघांना अटक व सुटका
By admin | Published: June 26, 2016 08:43 PM2016-06-26T20:43:35+5:302016-06-26T20:43:35+5:30
जळगाव : अजिंठा चौफुलीवर गोंधळ घालत पोलिसांसह वाहनांवर दगडफेक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील ४ संशयित आरोपींना २६ जूनला सकाळी अटक करण्यात आली. अटकेनंतर चौघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Next
ज गाव : अजिंठा चौफुलीवर गोंधळ घालत पोलिसांसह वाहनांवर दगडफेक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील ४ संशयित आरोपींना २६ जूनला सकाळी अटक करण्यात आली. अटकेनंतर चौघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.शाहरूख खान इकबाल खान, शेख वसीम शेख रशीद कुरेशी, वसीम अली बशीर अली व नइम खान रहीम खान (चौघे रा.जळगाव) अशी चारही संशयित आरोपींची नावे आहेत. एमआयडीसी पोलिसांनी त्यांना २६ जूनला सकाळी अटक केली. अटकेनंतर चौघांना दुपारच्या सुमारास न्यायाधीश एम.एम. चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने सुरुवातीला त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर संशयित आरोपींनी वकिलामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने चौघांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. सरकारतर्फे ॲड.अनिल पाटील यांनी तर संशयितांतर्फे ॲड.राशीद पिंजारी यांनी कामकाज पाहिले.